Home गडचिरोली गडचिरोली जिल्हा काँग्रेस च्या वतीने डिजिटल सदस्यता नोंदणी प्रशिक्षण

गडचिरोली जिल्हा काँग्रेस च्या वतीने डिजिटल सदस्यता नोंदणी प्रशिक्षण

39

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.22जानेवारी):-अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी व मा.खासदार राहुलजी गांधी यांच्या सूचनेनुसार सम्पूर्ण देशभरात व मा.प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात व मा.महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्यात कॉग्रेस पक्षाला येणाऱ्या काळात अधिक मजबूत करण्याकरिता व पक्षाच्या सर्व सदस्यांची अधिकृत माहिती ठेवण्या करीता तसेच पक्षाचे ध्येय धोरण निश्चिती करिता *Digital सदस्यता मोहीम* सुरू केली असून, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक 22 जानेवारी 2022, रोज शनिवार ला सर्व तालुका अध्यक्ष, सर्व जिल्हा परिषद गट प्रमुख यांना जिल्हा काँग्रेस कार्यालयात 1 दिवशीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुख्य अतिथी म्हणून सोशल मीडिया सेल प्रदेश महासचिव नंदुभाऊ वाईलकर, शहराध्यक्ष सतिश विधाते, अनुसूचित विभाग जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, मुख्य मार्गदर्शक म्हणून जिल्हा सचिव तथा निवडणूक सल्लागार सुनील चडगुलवार उपस्थित होते. तर प्रशिक्षणार्थी म्हणून गडचिरोली तालुका अध्यक्ष नेताजी गावतुरे, मूलचेरा ता.अध्यक्ष रविंद्र शाहा, संजय पंदीलवार, दिलीप घोडाम, विकास रायसीडाम, भुपेश कोलते, अरविंद फटाले, कृष्णा झंजाळ, सत्यवान वाघाडे, संतोष लाकडे, मनोहर नवघडे, अभिजीत मेश्राम, कमेलश बारस्कर, पिंकू बावणे, भोलेनाथ धानोरकर, गजानन घरात, प्रभाकर कुबडे, पुरुषोत्तम अरकपटलवार, मिलिंद खोब्रागडे, पंकज चहादे, नितीन राऊत, कृनाल माणूसमारे, आरती लाहेरी, नीता वडेट्टीवार, उज्वला मडावी, गौरव एनप्रेद्दीवार, विपुल एलट्टीवार, कुणाल ताजने सह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here