Home महाराष्ट्र दापोरी येथील नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याची मागणी !

दापोरी येथील नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याची मागणी !

104

🔸वितरण व्यवस्था शिकस्त ; जनतेला करावा लागत आहे पानी टंचाईचा सामना !

🔹रुपेश वाळके यांचे आमदार देवेंद्र भुयार यांना साकडे !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.22जानेवारी):-तालुक्यातील दापोरी येथील ३ हजार लोकसंख्या असलेल्या गावाला मागील काही वर्षांपासून भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी टंचाई समस्या निकाली काढण्यासाठी मागील १० वर्षांपासून अद्याप मुहूर्त न निघाल्याने दापोरी येथील वितरण व्यवस्था खराब झाल्यामुळे, पाण्याची पातळी अतिशय खोल गेल्याने दापोरी येथील नागरिकांचे हाल मोठ्या प्रमाणात होतांना दिसत आहे. तरीसुद्धा टंचाईग्रस्त गावासाठीच्या नवीन पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव ठप्प झाल्याचे दिसत आहे. या पाणी पुरवठा योजनेअभावी व वितरण व्यवस्था शिकस्त झाल्यामुळे दापोरी गावामध्ये आगामी उन्हाळय़ात कोसो दुरवरून पानी आणावे लागनार असून गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याशिवाय प्रशासनापुढे दुसरा पर्याय राहणार नसल्याचे चित्र दिसत आहे. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली व मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झालेली मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना मागील १० वर्षांपासून कागदावरच राहिली.

दापोरी येथील गंभीर पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी जल जीवन मिशन अंतर्गत दापोरी येथील नवीन पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव आमदार देवेंद्र भुयार यांच्याकडे सादर करून तात्काळ निधी उपलब्ध करून दापोरी येथील पाणी समस्या निकाली काढण्यासाठी दापोरी येथील पाणी टंचाई दूर करण्यासाठी नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे

शासनाकडे मागील १० वर्षांपासून दापोरी येथील पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा पाणी पुरवठा योजना कागदावरच राहिली त्यामुळे पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत मंजूर न झाल्यामुळे आज दापोरी गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी उन्हाळय़ात टंचाईग्रस्त दापोरी गावामध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. यावर प्रशासनाचा लाखो रुपयांचा खर्च होणार आहे. त्यामुळे जलजीवन मिशन अंतर्गत दापोरी येथील नवीन पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता देऊन तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार देवेंद्र भुयार यांनी ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांना दिले.

मोर्शी तालुक्यातील दापोरी येथील पाणी टंचाई बाबत येत आलेल्या समस्याचे निराकरण करण्याकरिता दापोरी गावामध्ये पाणी टंचाई भविष्यात निर्माण होऊ नये याकरीता आमदार देवेंद्र भुयार यांनी पुढाकार घेतला असून प्रत्येक वर्षी अधिग्रहनाच्या भरवशावर न बसता कायमस्वरूपी सोर्स निर्माण करणे गरजेचे असून जल जीवन मिशन अंतर्गत टंचाईग्रस्त गावातील प्रस्ताव सादर करून कायमस्वरूपी सोर्स निर्माण करण्याकरिता दापोरी येथील जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी आमदार देवेंद्र भुयार यांना परिपूर्ण प्रस्ताव सादर केला असून आमदार देवेंद्र भुयार यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून, तांत्रिकदृष्ट्या योजनेचा सखोल अभ्यास करून दापोरी येथील नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामांना तात्काळ प्रशासकीय मान्यता मिळवून दापोरी येथील पाणी समस्या कायमस्वरूपी निकाली काढणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here