



✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)
आष्टी(दि.22जानेवारी):-मौजे चिंचाळा येथील रोहिदास नाना चिमाजी पोकळे यांचे दिनांक २१ जानेवारी रोजी निधन झाले.ते गेली पाच,सहा दशके यात्राउत्सव,लग्न वराती मधून हौसेने लेझीम पथकासोबत ढोल वाद्य वाजवीत असत.आटोकशीर उंची असताना खास ठेक्यात,ताशाच्या सोबतीने ढोलाचा आवाज लेझीम पथकाच्या अंगात भिनलेला असायचा.त्यांच्यामुळे शेकडो तरुण लेझीम पथकात उत्साहाने सहभागी व्हायचे.ते उत्कृष्ट गायनाचार्य होते.भजनात गवळण गायन हा त्यांचा आवडीचा भाग होता.
पंचक्रोशीत ख्याती प्राप्त रोहिदास नाना पोकळे च्या रूपाने एक ढोल वाद्य सम्राट हरपला असे कवी प्रा.सय्यद अलाऊद्दीन म्हणाले.रोहिदास नाना ७५ वर्षाचे होते.लमणतळ्यात यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी पंचक्रोशीतील त्यांचे अनेक चहाते,सतीश आबा शिंदे,ह.भ.प.नवनाथ महाराज,सरपंच दिगंबर पोकळे,एकनाथ पोकळे,देविदास भाऊ,घनश्याम पोकळे,परसू दुकानदार,मधूनाना,गावातील अबालवृद्ध उपस्थित होते.


