Home महाराष्ट्र घुग्घुस येथील नवीन ग्रामीण रुग्णालय व नवीन बस स्थानकाच्या शासकीय कामात वापरण्यात...

घुग्घुस येथील नवीन ग्रामीण रुग्णालय व नवीन बस स्थानकाच्या शासकीय कामात वापरण्यात येणाऱ्या रेती साठ्यांची चौकशी करा

318

🔹आपचे शहराध्यक्ष अमित बोरकर यांची मागणी

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.21जानेवारी):-शुक्रवार 21 जानेवारी रोजी घुग्घुस आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष अमित बोरकर यांनी तलाठी कार्यालयात निवेदन देऊन घुग्घुस शहरातील नवीन ग्रामीण रुग्णालय व नवीन बस स्थानकाच्या शासकीय इमारतीच्या बांधकामात वापरण्यात येत असलेल्या रेती साठ्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

सध्या घुग्घुस शहरात नवीन ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काम व बस स्थानक इमारतीचे काम जोमाने प्रगती पथावर सुरु आहे.
या इमारतीच्या बांधकामा साठी वापरण्यात येत असलेली रेती ही अवैध असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे कारण घुग्घुस परिसरातील रेती घाटांचा लिलाव मागील तीन ते चार वर्षा पासून झाला नाही त्यामुळे शासनाचा करोडो रुपयाचा महसूल बुडाला आहे.
घुग्घुस शहरातील नवीन ग्रामीण रुग्णालय व बस स्थानक इमारतीच्या ठिकाणी मोठे रेतीचे साठे आहे. त्यामुळे या रेती साठ्यांची महसूल विभागाने चौकशी करावी व ते अवैध आढल्यास तात्काळ जप्त करून दोषी कंत्राटदारावर कडक कारवाई करावी अन्यथा घुग्घुस आम आदमी पार्टीतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी घुग्घुस आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, विकास खाडे, आशिष पाझारे, निखिल कामतवार, प्रशांत पाझारे, प्रशांत सेनानी, रवी शंतलावार, अभिषेक तलापेल्ली, अनुप नळे, सागर बिऱ्हाडे, स्वप्नील आवळे व इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here