Home Breaking News RTO मध्ये आलेल्या वाहनचालकाकडे लाच मागितली; ACB ने एजंटसह अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या

RTO मध्ये आलेल्या वाहनचालकाकडे लाच मागितली; ACB ने एजंटसह अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या

327

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.21जानेवारी):-मध्ये आरटीओ कार्यालयात आलेल्या वाहनचालकाकडे त्याचं काम पूर्ण करण्यासाठी लाच मागणं एका खासगी एजंट आणि अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी प्रतिवाहन पाचशेप्रमाणे चार वाहनांसाठी दोन हजार रुपयांची लाच मागणी करणाऱ्या वाहन निरीक्षकासह एजंटास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान एसीबीच्या कारवाईने एआरटीओतील लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे. रविकिरण नागनाथ भड असे मोटार वाहन निरीक्षकाचे नाव असून प्रवीण सीताराम गायकवाड हा खासगी एजंट आहे. संबंधित प्रकरण हे 16 सप्टेंबर 2021 चे आहे. एका व्यक्तीच्या चार वाहनांच्या फिटनेस (योग्यता) प्रमाणपत्रासाठी प्रत्येकी 500 रुपये लाचेची मागणी वाहन निरीक्षक रविकरण भड याने एजंट प्रवीण गायकवाडमार्फत केली होती.

त्यानंतर संबंधित वाहनचालकाने त्याच दिवशी एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारदारास सोबत घेऊन लाच मागणी पडताळणी केली असता वाहन निरीक्षक भड याने लाचेची रक्कम एजंट गायकवाड याच्याकडे देण्यास सांगितल्याचं निषपण्ण झालं होतं. दरम्यान, त्यानंतर दोनवेळा सापळा लावण्यात आला. पण संशय आल्याने वाहन निरीक्षक भड याने लाच स्वीकारली नव्हती.

त्यामुळे फक्त लाच मागणीचा गुन्हा नोंद झाला. (विरारमध्ये नराधमांचा हैदोस, तरुणाला अमानुष मारहाण) संबंधित घटनेनंतर समाजसेवक शेख बक्शु यांनी इथल्या लाचखोरीची तक्रार एसीबीसह थेट मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर खळबळ उडाली. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने आज सकाळी सापळा रचून या प्रकरणात चार वाहनांचे प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्ती गायकवाड याला ताब्यात घेतले. तर सहायक मोटार वाहन निरीक्षक रविकिरण नागनाथ भड यास थेट उमरगा चेकपोस्टवरून आज पहाटे ताब्यात घेतले. त्याच्या बीड आणि बार्शी तालुक्यातील मूळगावी एसीबीने छापे टाकून चौकशी सुरू केली आहे. या घटनेने आरटीओ कार्यालयातील लाचखोरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here