



✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.21जानेवारी):-सकाळ माध्यम समूहाच्या यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क (यिन) अंतर्गत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि यिन मंत्रिमंडळातील विविध खात्यांचे वाटप नुकतेच पुणे येथे पार पडले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ब्रह्मपुरी येथे बी. ए.तृतीय वर्षाला असलेला चंद्रपूर यिन ग्रामीण जिल्हाध्यक्ष आदर्श अरुण अमृतकर यांची यिन मंत्रिमंडळात आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री पदी निवड करण्यात आली.
यावेळी महाराष्टातील यिन चे सर्व जिल्हाध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रियेत सहभागी झाले होते. लेखी व तोंडी परीक्षेतील उमेदवारांचे प्रावीण्य, नेतृत्व आणि वकृत्व कौशल्य अशा विविध कसोट्यांवर आधारित निवड प्रक्रिया राबविण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.देवेश कांबळे, शिक्षण संस्थेच्या सदस्या तथा समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ.स्निग्धा कांबळे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.तुफान अवताडे, महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी आदर्श अमृतकर यांचे अभिनंदन केले.


