



✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)
तलवाडा(दि.21जानेवारी):-महाराष्ट्रात सध्या रब्बी उन्हाळी हंगामात पेरणी सुरु आहेत .ऊस. फळबाग. भाजीपाला. गहु या पिकासाठी शेतकऱ्यांकडुन खताची मागणी वाढत आहे.त्यामुळे रासायनिक खत …कंपन्यांनी त्यांच्या कडील जुन्या खतांचा साठा जुन्या दरानेच विक्री करावा व याबाबत कृषी विभागाने ही लक्ष ठेवावे.रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे लागवडयोग्य क्षेत्र वाढलेले आहे एकीकडे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत असताना दुसरीकडे खते बी बियाणे रासायनिक खते यांच्या किंमती वाढत आहेत केंद्र सरकारने व राज्य सरकारने खत विक्री दर नियंत्रित करावे ..
महागडे खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही दर वाढल्यामुळे शेतकऱ्यामध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे.6 डिंसेबर 2021 रोजी घोषित केलेल्या दरांनुसार प्रति 50 किलो बँगचा खतनिहाय दर
10.26.26. 1440 (1640) 170 रुपये वाढ
16.20.13. 1075 ( 1250) 175 रुपये वाढ
15.15.15.09. 1180 (1375) 195 रुपये वाढ
खताचे भाव कमी करण्याची मागणी शेतकरी पुत्र राजेंद्र नवले यांनी केंद्रीय खते व रसायनिक मंत्री मनसुख मांडलिया तसेेच दादा साहेब भूसे कृषि राज्य मंत्री महाराष्ट्र यांना मेल व्दारे केली आहे.


