Home महाराष्ट्र दंगली घडविण्यासाठी इतिहासाचे विद्रुपीकरण.:- पँथर डॉ. राजन माकणीकर

दंगली घडविण्यासाठी इतिहासाचे विद्रुपीकरण.:- पँथर डॉ. राजन माकणीकर

294

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई(दि.20जानेवारी):-भीमा कोरेगाव खरा इतिहास दडवून इतिहासाचे विद्रुपीकरण करण्याचा घाट काही मनुवाद्यांनी घातला असून दंगली घडविण्यासाठी पुस्तके लिहिली जात आहेत. असे मत रिपब्लिकन पार्टीऑ इंडिया (डेमोक्रॅटिक) पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.कुठलेही संदर्भ जोडून महार पूर्वजांच्या वीर पराक्रमाला कमी लेखले जाऊन जाती अंताची लढाई नसून चकमक झाल्याची मुर्खता काही करत आहेत.छत्रपती संभाजी महाराजांच्या खुनाचा बदला म्हणून झालेल्या घनघोर युद्धाला मनुवादी खोट सिद्ध करू पाहत आहेत.

महारांच्या पूर्वजांचा पराक्रम यांनी पचनी पडत नसून बहुजन जागा होऊन नको त्या भानगडीत न पडता आपल्या पूर्वजांच्या शूर्याला अभिवादन करण्यास वरचेवर गर्दी करत असून होत असलेली जागृती काहींना पाहवली जात नाही आहे.खोटा प्रचार करून प्रसिद्धी मिळवणे, दंगली घडवणे व शूर महार योद्ध्यांना कमी लेखने ८केवळ हाच हेतू असून कोणीही या गोष्टीला महत्व देऊ नये असे आवाहन डॉ राजन माकणीकर यांनी केले आहे.आमचे पूर्वज शूर होते आम्ही शूर आहोत आणि आमची पुढची पिढीही शूरच असेल त्यामुळे कोणतेही दाखले देण्याची गरज नाही, इतिहासाची पाने चाळतांना निरपेक्ष भावना ठेवावी म्हणजे असे भेद दिसून येणार नाहीत असाही सल्ला सल्ला विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here