




✒️नायगाव,तालुका प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)मो:-8767514650
नायगाव(दि.20जानेवारी):- नगर पंचायत निवडणूकीत माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे 17 पैकी 17उमेदवार दणदणीत विजय झाले असून आमदार राजेश पवार यांच्या नेतृत्वाखालील एकही उमेदवार निवडून न आल्याने भाजपचा दारूण पराभव झाला आहे.
नायगाव नगर पंचायत माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील विजय उमेदवार…आशाताई बोईनवाड, शरद भालेराव, सुधाकर शिंन्दे, शिवाजी कल्याण, मिनाबाई कल्याण, सय्यद सहकारी हाजी हाजीसाब, दयानंद भालेराव, विजय चव्हाण, विठ्ठल बेळगे, आर्चना चव्हाण, काशीबाई मुद्देवाड, पंकज चव्हाण, ललीता भालेराव, सखरीबेखम हजीसाब सुमन सोनकांबळे,गीता जाधव अशी आहेत यामुळे माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या विचारांशी मतदारांचा कौल आहे असे नायगाव नगर पंचायत निवडणूकीत दिसून आले…




