Home Breaking News पोलीस शिपायाचा विवाहीत महिलेवर अत्याचार

पोलीस शिपायाचा विवाहीत महिलेवर अत्याचार

173

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.20जानेवारी):- पाथरी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत पोलीस शिपायाने ब्रह्मपुरी येथील पेठ वार्ड मध्ये राहणाऱ्या एका विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची घटना आज दिनांक 19 जानेवारी रोजी उघडकीस आली असून लालश्याम बाबुराव मेश्राम वय (51) असे अत्याचार करणाऱ्या पोलिस शिपायाची नाव आहे सध्या आरोपी पाथरी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असल्याचे विश्‍वसनीय माहिती आहे.

फिर्यादी अत्याचारग्रस्त महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार लालश्याम बाबुराव मेश्राम याला ब्रह्मपुरी पोलिसांनी अटक केली असुन फिर्यादी विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून लालश्याम मेश्राम यांच्या विरोधात कलम अप क्र.30/2022 भारतीय दंड संहिताचे कलम376(2)(n)345(d)(1)500,506 भादवी सह कलम 67(अ)माहीती व तंत्रज्ञान अधिनीयम 2000 चे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर घटनेचा तपास ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक स्वाती फुलेकर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here