Home बीड कोरोनामुळे आठवडी बाजारात बसू दिलं नाही; संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकला भाजीपाला

कोरोनामुळे आठवडी बाजारात बसू दिलं नाही; संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकला भाजीपाला

104

🔺पहा कुठे घडला हा प्रकार.?

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.20जानेवारी):- जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत असून यामुळे जिल्ह्यातील आठवडी बाजारांवर काहीसे निर्बंध लादले गेले आहेत. याच अनुषंगाने बीडच्या माजलगावमध्ये आज, प्रशासनाकडून आठवडी बाजारात शेतकऱ्यांना भाजीपाला विकण्यासाठी बसू दिलं गेलं नाही. शेतकऱ्यांनी विनंत्या केल्या मात्र कर्मचाऱ्यांनी ऐकलं नाही. यामुळं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला भर रस्त्यावर फेकून, शासनाचा निषेध करत तर रोष व्यक्त केला. तर दुसरीकडे नुकत्याच पार पडलेल्या नगर पंचायत निवडणुकांमध्ये कोरोना नियमांचा पूर्णतः फज्जा पाहायला मिळाला.

आज वडवणी, केज, आष्टी, पाटोदा, शिरूर मध्ये हजारो राजकीय कार्यकर्त्यांसह त्यांचे नेते रस्त्यावर आले होते.मात्र, याकडे कोणत्याच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही. तर दुसरीकडे या शेतकऱ्यानं बाबतीत प्रशासनाच्या या भूमिकेने, शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना जो नियम लागू केला आहे. त्यानुसार कोरोना नियमांचा फज्जा मांडणाऱ्या राजकीय नेत्यांवर, गुन्हा दाखल होणार का? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष्य लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here