



🔹कृषी धोरणाच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून सक्तीची वीज बिल वसुली !
🔸रुपेश वाळके यांची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे मागणी !
✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)
मोर्शी(दि.20जानेवारी):-कृषी धोरणाच्या नावाखाली महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांकडून सक्तीने वीज बिल वसुली करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. थकबाकी न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सुरू असून, मागील पंधरा दिवसा पासून विद्युत वितरण कंपनी कडून कृषी पंपाच्या थकीत वीज बिल वसुली साठी शेती पंपाचे कनेक्शन विविध भागात तोडणी चालू आहे मात्र शेतकऱ्याच्या आर्थिक बाजूची थोडी तरी जाणीव करुन ही सक्तीची वीज वसुली थांबवून विज कनेक्शन कट करणे थांबवा अशी मागणी बळीराजा संत्रा उत्पादक संघाचे अध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.
मोर्शी तालुका विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून नैसर्गिक संकटांमुळे मागील काही वर्षापासून संत्राचा मृग बहार व आंबिया बहार फुटत नसल्यामुळे, योग्य भाव मिळत नसल्यामुळे मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टीने हाताला आलेली पीक जमीन दोस्त झाली खरीप शेतकऱ्याच्या हातून गेला रब्बी पिकाच्या उत्पन्नातून तरी चार पैसे मिळतील त्या उत्पादनातून चार पैसे हातावर येताच शेतकरी वीज बिल भरतील शेतकरी अडचणीत असल्यामुळे बिल भरू शकत नाही. सक्तीची वीज बिल वसुली थांबवा शेतकऱ्यांची वीज तोडन्या आगोदर शेतकऱ्यांना लेखी नोटीस दिल्या शिवाय कुठल्याच शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज कनेक्शन कट करु नये ,जर हे थांबणार नसेल तर शेती पिकांच नुकसान झालं तर त्याची विद्युत वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, एका डी पी वरील थकबाकी साठी संपुर्ण फिटर बंद करु नका आन्यथा आपल्या कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा बळीराजा संत्रा उत्पादक संघाचे अध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
नैसर्गिक संकटांमुळे आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच मागील वर्षी कोरोनामुळे शेतीतून उत्पादित झालेल्या मालाला भाव मिळाला नाही. त्यामुळे शेती व्यवसाय नकोच अशी धारणा शेतकऱ्यांची आहे. मात्र, नाईलाजाने शेतकऱ्यांना शेती करावी लागते. अशा वेळी शेतकऱ्यांच्या भावना व कष्ट’डोळ्यासमोर ठेवून सक्तीची वीज बिल वसुली करण्याच्या आदेशाला स्थगिती द्यावी, महावितरण कंपनीने सक्तीची वीज बिल वसुली तात्काळ थांबवून शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा करावा, जळालेले रोहित्र २४ तासांत बदलून देण्याची व्यवस्था करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. —– रुपेश वाळके अध्यक्ष बळीराजा संत्रा उत्पादक संस्था तथा ग्राम पंचायत सदस्य.


