



✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
चंद्रपुर(दि.20जानेवारी):- येथील कृष्णा नगर येथे स्थित असलेल्या राधा गोविंद मंदिर श्रीकृष्ण भगवंताच्या भक्तांचे श्रद्धा स्थान असून येथे अनेक वर्षापासून भगवान श्रीकृष्ण पारायण ,सत्संग, कीर्तन असे विविध कार्यक्रम होत असतात.दरवर्षी प्रमाणे यंदाही सत्संग, कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कृष्ण नगरीत राधे राधे नावाचा जयघोष करण्यात आला.
भगवान श्रीकृष्ण यांचा नावाच्या भक्ती संगीतात सर्वत्र कृष्ण नगरी भक्ती गीतात मग्न झालेली होती. सदर कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यास माजी समाजकल्याण सभापती तथा तत्कालीन जि.प सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांनी हजेरी लावली. भक्ती सत्संगाच्या रमणीय वातावरणाच्या आस्वाद श्री कृष्ण भक्तानी घेतला.





