



✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कोल्हापूर(दि.19जानेवारी):-भारताचे सृजनशील नागरिक घडवण्यासाठी काम करणाऱ्या बालसाहित्य कलामंचच्या कृतीशील उपक्रमाच्या मदतीसाठी सुप्रसिद्ध चित्रकार, फोटोग्राफर आणि लेखक मिलिंद यादव यांच्या फोटोग्राफीचे भव्य प्रदर्शन कलादालन, राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे दि. 23 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2022 रोज सकाळी 10:00 ते रात्री 8:00 वाजेपर्यंत आयोजित केले आहे.या भव्य प्रदर्शनाचे उदघाटन रविवार दि. 23 जानेवारी, 2022 रोजी दुपारी 12:30 वा. कलादालन, राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे जागतिक दर्जाचे चित्रकार संजय शेलार आणि ज्येष्ठ रंगकर्मी संजय हाळदीकर यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. सतीशकुमार पाटील, चंद्रकांत निकाडे, अशोक पाटील, रघुनाथ मांढरे, मोहन मिणचेकर, अब्राहमबापू आवळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बालसाहित्य कलामंचने गेली 3-4 वर्षे मुलांचे व्यक्तिमत्व विकास, वक्तृत्व व लेखन कला विकसित करणे, मुलांच्या कलागुणांच्या विकासासाठी व वाचन संस्कृती वाढवण्यासाठी तसेच महामानवांची ओळख करून देण्यासाठी खास प्रयत्न केलेले आहेत.बालसाहित्य कलामंचचे समन्वयक शांतीलाल कांबळे, चंद्रनिल सावंत, विजय कोरे, नोहा आवळे, विवेक सुतार, श्रुतिक कांबळे, आदित्य म्हमाने, भार्गव सावंत, श्रेया भोसले, प्रणाली ठाणेकर, मंथन जगताप, अमिरत्न मिणचेकर, समीक्षा बुचडे, शिवतेज राजहंस, शौर्य वर्धन, यूशरा मकानदार, श्रद्धा भोसले आदींनी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.सदर प्रदर्शनास कोल्हापूरकरांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी असे आवाहन आयोजक श्रावस्ती प्रकाशनचे प्रकाशक डॉ. कपिल राजहंस यांनी केले आहे.





