



✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.19जानेवारी):-भारतीय जनता पक्षाला मिळालेले यश हे फार प्रेरणादायी आहे अशी प्रतिक्रिया भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिली या यशासाठी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.तसेच हे निकाल म्हणजे भविष्यामध्ये ही विजयाची सुरुवात आहे असेही मुंडे म्हणाल्या. राज्यात भाजपलाच जनादेश मिळाला होता, बीडमध्येही पालकमंत्री म्हणून केल्या कामाची पावती जनतेने दिली आहे असे मुंडे म्हणाल्या. विधानसभेत झालेल्या चुका अजूनही लोक भोगत आहेत.
बीड जिल्ह्यात फक्त राजकारण होत असून विकास मागे पडला आहे. सध्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुठेही सुसुत्रता दिसत नाही. सध्या जनतेला योग्य नेतृत्वाची गरज असून त्यांनी आम्हाला संधी दिली आहे. नगर पंचायत तो झांकी है जिल्हापरिषद अभी बाकी है असेही पंकजा मुंडे यांनी नमूद केले.
लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला
सांगलीच्या कवठेमहांकाळ नगरपंचायत मध्ये एक हाती सत्ता रोहित आर आर पाटील यांनी मिळवला आहे.. हा विजय सर्व सामान्य माणसाच्या आहे.काही लोकांनी बाप काढला पण त्यांना आता बाप तर बाप.. लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि निवडून दिले आहे.





