Home महाराष्ट्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना धक्का, मुलगी डॉ.हर्षदाचा झाला पराभव

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना धक्का, मुलगी डॉ.हर्षदाचा झाला पराभव

97

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

केज(दि.19जानेवारी):-नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना मोठा धक्का बसला आहे.वार्ड क्रमांक २ मधून त्यांच्या कन्या डॉ. हर्षदा यांचा पराभव झाला आहे. जनविकास आघाडीकडून आशाबाई सुग्रीव कराड ह्या विजयी झाल्या.

त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून कविता उध्दवराव कराड, शिवसेनेकडून सग्जनाबाई गुलाब दांगट, राष्ट्रवादीकडून डॉ. हर्षदा बजरंग सोनवणे ह्या चार उमेदवार होत्या.डॉ. हर्षदा यांचा १७ मतांनी पराभव झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी मुलीच्या विजयासाठी ताकद लावली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here