Home बीड उमराई रोहयो अंतर्गत ७ लाखांचा अपहार, प्रदीप काकडे यांची कारवाईस टाळाटाळ;रोहयो प्रधान...

उमराई रोहयो अंतर्गत ७ लाखांचा अपहार, प्रदीप काकडे यांची कारवाईस टाळाटाळ;रोहयो प्रधान सचिव, विभागीय आयुक्त यांना तक्रार

324

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.19जानेवारी):-उमराई ता.अंबाजोगाई जि.बीड ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील ६ लाख ७ हजार रूपये गैरव्यवहार प्रकरणात गुन्हे दाखल करण्यास उपमुख्य कार्यकारी आधिकारी( पंचायत समिती)जिल्हापरिषद बीड प्रदीप काकडे जाणीवपूर्वक कारवाईस दिरंगाई करत असून भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण केल्याबद्दल त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी ,उपजिल्हाधिकारी रोहयो विभाग जि.का.बीड ,मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांच्यामार्फत रोहयो प्रधान सचिव, विभागीय आयुक्त यांना तक्रार केली आहे.

सविस्तर माहीतीस्तव
__
बीड जिल्ह्य़ातील अंबाजोगाई तालुक्यातील मौजे. उमराई ग्रामपंचायत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०२० मध्ये झालेल्या सामाजिक अंकेक्षणात दि.२ सप्टेंबर २०२० ते १० नोव्हेंबर २०२० या कालावधीत ६ लाख ७ हजार रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे सामाजिक अंकेक्षणामध्ये समोर आले असून डाटा एन्ट्री ऑपरेटर, संगणक परिचालक यांनी संगनमतानेच स्वतःच्या आणि गावाबाहेरील मजुरांच्या नावे पैसे उचलण्यात आले आहेत.

सामाजिक अंकेक्षणातील गंभीर त्रुटी खालीलप्रमाणे
______
१) बनावट जाॅबकार्डचा उपयोग करणे
____
उमराई येथील ३२ जाॅबकार्डवरील १६ व्यक्तिंची एमआयएस डाटानुसार पडताळणक केली असता सदर जाॅबकार्ड एकाच कुटुंबातील व्यक्तीची नावे वेगवेगळ्या जाॅबकार्डमध्ये नोंदविण्यात आली असून ईतर कुटुंबातील व्यक्तीची सुद्धा नावे आढळुन आली आहेत.

२) ४ बॅक खात्यात १७३,०४० रक्कम ;रोजगार हमी योजनेचा संबधच नाही
_____
ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक परिचालक नितिन जनार्दन केंद्रे या व्यक्तीचे ४ वेगवेगळ्या बॅकेत खाते असुन सदर चारही खात्यावर एमआयएस डाटा नुसार रोजगार हमी योजनेत काम न करताच रक्कम अदा करण्यात आली असून सदर व्यक्तिचा जाॅबकार्डधारकाशी कसलाही संबंध येत नाही.

३) ३ व्यक्तिच्या नावे १८५,४००
___
ईतर गावातील ३ व्यक्तिच्या १) विकास भानुदास केंद्रे रा. केंद्रेवाडी २) प्रकाश भानुदास केंद्रे, ३) सिद्धेश्वर केंद्रे रा. काळेवाडी यांच्या बॅक खात्यांमध्ये मजुरांची १८५,४०० रूपये रक्कम जमा करण्यात आली.

४) जाॅबकार्ड व मजुरीशी संबंध नसलेल्याच्या नावावर २४३,६९८ रूपये
___
जाॅबकार्ड आणि रोजगार हमी मजुराचा काहीही संबंध नसलेल्या व्यक्तिच्या बॅक खात्यावर २ लाख ४३ हजार सहाशे अठ्ठावन्न रूपये जमा करण्यात आले.

५) ग्रामरोजगार सेवकाच्या नावे ५ मस्टर भरले
___
ग्रामरोजगार सेवक भास्कर ज्ञानोबा फुंदे यांच्या नावावर ५ मस्टर भरण्यात येऊन ५३५६ रूपये काढण्यात आले म्हणजेच ग्रामरोजगार सेवक रोहयो कामावर मजुर म्हणून दाखवण्यात आला आहे.

वरील प्रकरणात गटविकास आधिकारी पंचायत समिती अंबाजोगाई संदिप घोनीसकर यांनी दोन वर्षापुर्वी उमराई ग्रामपंचायत अंतर्गत रोहयो कामामध्ये साडेसात लाख रूपयाचा घोटाळा झाला असून वरिष्ठांना अहवाल सादर केल्याचे कळवले आहे परंतु उपमुख्य कार्यकारी (पंचायत समिति)जिल्हापरिषद बीड पी. बी. काकडे जाणीवपूर्वक भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण करत असून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.

प्रदिप काकडे मुख्य कार्यकारी आधिकारी अजित पवार यांची दिशाभूल करतात
___
उपमुख्य कार्यकारी आधिकारी( पंचायत समिती)जिल्हापरिषद बीड प्रदीप काकडे हे भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण करत असून जाणीवपूर्वक मुख्य कार्यकारी आधिकारी यांची दिशाभूल करत कारवाईस दफ्तर दिरंगाई करत असून त्यांना त्यांना पदावरून हटविण्याची आवश्यकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here