



🔹लाभार्थ्यांवर आर्थिक संकट
🔸लोकप्रतिनिधी या लाभार्थ्यांचे संकट दूर करतील का ?
✒️भास्कर फरकडे(चामोर्शी तालुका,प्रतिनिधी)मो:-९४०४०७१८८३
चामोर्शी(दि.19जानेवारी): – शासनाने विकलांग, वृद्ध, निराधार महिलांना आधार देण्यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धपकाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना, विकलांग निवृत्ती योजना, व विविध योजना अमलात आणल्या आहेत. चामोर्शी तालुक्यातील हजारो लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र मागील अनेक महिन्यापासून काही लाभार्थ्यांचे मानधन बॅकेत जमा होत आहेत तर काही लाभार्थी वंचित आहेत या योजनेच्या काही लाभार्थ्यांचे अनुदान प्रलंबित असल्यामुळे या लाभार्थ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
मागील अनेक महिन्यापासून काही लाभार्थ्यांना अनुदान न मिळाल्यामुळे लाभार्थी बॅंकेत, तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत त्याना शारीरिक ,मानसिक,आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे जिल्हा परिषद,पंचायत समिती, निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने ईछूकांचे भेटी गाठी सूरू झाल्या आहेत. पण या निराधार योजनेच्या लाभार्थ्याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे मोठे होण्यासाठी मत मागायला येतात पण आमच्या अडचणी कडे कोणीच लक्ष देत नाही असे शासनाकडून मिळणार्या असे मानधनापासून वंचित असलेल्या निराधार लाभार्थ्याकडून बोलल्या जात आहे.


