Home बीड कोरोना नियमांना हरताळ; इंदुरीकर महाराजांच्या जाहीर किर्तनाला हजारोंची गर्दी

कोरोना नियमांना हरताळ; इंदुरीकर महाराजांच्या जाहीर किर्तनाला हजारोंची गर्दी

72

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.19जानेवारी):- जिल्ह्यात कोरोनाची दिवसेदिवस वाढती रुग्ण संख्या आणि ओमिक्रॉनचा धोका, यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळं धार्मिक, राजकीय कार्यक्रमाला बंदी घालण्यात आली आहे. मात्र ही बंदी फक्त नावा पुरतीच आहे का ? असा प्रश्न हा कार्यक्रम पाहून आपणास पडेल. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील, कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केलेली असताना, बीडच्या नांदुरघाट गावात निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाला हजारो लोक एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी सोशल डिस्टंसिंग आणि कोरोना नियमांचा अक्षरशः फज्जा उडाल्याचं चित्र दिसून आलं. यावेळी संयोजक मंडळी आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शासनाने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या अनुषंगाने, नियमावली जाहीर करत निर्बंध लादले आणि शाळा महाविद्यालय बंद केले.

मात्र दुसरीकडे अशा धार्मिक अन राजकीय कार्यक्रमाला हजारोची गर्दी कोरोनाला निमंत्रण देणारी आहे. सरकारच्या नाकावर टिच्चून निवृत्ती महाराज इंदुरीकर मोठमोठे कीर्तन घेत आहेत व किर्तनाला हजारोंचा जनसमुदाय विना मास्क एकत्र दिसत आहे. तरी देखील शासन-प्रशासन मूग गिळून गप्प आहे का ? विशेष म्हणजे नांदुरघाट येथे पोलीस चौकीच्या समोर बाजार तळावर हजारो लोक एकत्र झाल्याचे दिसत असताना देखील, पोलिसांनी डोळेझाक केली. यामुळे संताप व्यक्त केला जात असून या जाहीर किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी केले होते. त्यामुळे राजकीय नेत्यांना कोरोना नियमात सूट दिलीय का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Previous articleतुमचे आशीर्वाद मतदारसंघातील विकास कामे करण्यासाठी प्रेरणा देतात -आ. क्षीरसागर
Next articleचामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांचे मानधन प्रलंबित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here