Home महाराष्ट्र _मौ.कौडगाव येथील खासदार निधीतील सांस्कृतिक सभागृहाच्या नियमबाह्य, अत्यंत नित्कृष्ट व हीन दर्जाच्या...

_मौ.कौडगाव येथील खासदार निधीतील सांस्कृतिक सभागृहाच्या नियमबाह्य, अत्यंत नित्कृष्ट व हीन दर्जाच्या बोगस बांधकामची चौकशी करुन संबंधित यंत्रणेतील दोषी व्यक्तीविरुद कायदेशीर कठोर कार्यवाही करण्याची मागणी

217

✒️नवनाथ पौळ(विशेष प्रतिनिधी)

केज(दि.19जानेवारी):- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या विशेष निधितून जुन्या समाजमंदिराच्या जागेवर जुने समाजमंदिर पाडुन नविन सर्वसोयींनियुक्त सुसज्ज्य सांस्कृतिक सभागृह बांधण्यासाठी मंजुर केलेला निधी व त्यातून होणारे सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम प्रारंभापासूनच नियमबाह्य पध्दतीने अत्यंत निकृष्ट व हीन दर्जाचे होत असल्याने बोगस बांधकामची चौकशी करुन संबंधित यंत्रणेतील दोषी व्यक्तीविरुद कायदेशीर कठोर कार्यवाही करण्याची मागणी मौजे कौडगाव ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग अंबाजोगाई याच्याकडे ताक्रारीद्वारे केली आहे.

कार्यकारी अभियंता सा. बां. अंबाजोगाई यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि, आम्ही खालील सद्या करणार ग्रामस्थ मोजे कौडगाव ता. केज जि. बीड येथील मा. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. खा. रामदासजी आठवले साहेब यांच्या विशेष निधितून जुन्या समाजमंदिराच्या जागेवर जुने समाजमंदिर पाडुन नविन सर्वसोयींनौयुक्त सुसज्ज्य सांस्कृतिक सभागृह बांधण्यासाठी मंजुर केलेला निधी व त्यातून होणारे सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम प्रारंभापासूनच यमबाह्य पध्दतीने अत्यंत निकृष्ट व हीन दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित यंत्रणेकडे चौकशी केली असता दिशाभूल करणारी उत्तरे मिळाल्याने मा. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.खा. रामदासजी आठवले साहेब यांच्या निधीतून या सांस्कृतिक सभागृहाचे काम होत असुन ज्या उदात्त हेतुने मा. मंत्री महोदयांनी निधी मंजुर केला तो हेतु साध्य न होता या सांस्कृतिक सभागृहाचे काम करणाऱ्या यंत्रणेने स्वतःची तुमडी भरण्यासाठी सदर निधीचा नियमबाह्य पध्दतीने गैरवापर करुन अत्यंत निकृष्ट व हीन दर्जाचे, बोगस काम करत असल्याचे समोर आल्याने ग्रामस्थांनी प्रथमतः संदर्भ क्रं. 09 नुसार माहितीचा अधिकार अधिन माहिती अधिकार दि. 16.06.2020 ला देऊन सदर कामाच्या अंदाज पंत्रकासह आव मिळण्यासाठी अर्ज केला परंतु माहिती अधिकारी यांनी अद्यापपर्यंत माहिती उ न दिले.

त्यानंतर मा. तहसीलदार, तहसील कार्यालय, केज यांना संदर्भ क्रं. । नुसार तक्रार देऊन सदर अजांची प्रत माहितीस्तव व योग्य त्या कार्यवाहीस्तव :खा. रामदासजी आठवले (केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री), मा. जिल्हाधिकारी, बीड, मा. उपविभागीय अभियंता, सा.बां. उपविभाग, केज, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. बीड, मा. उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई यांना देण्यात आले. दरम्यान मा. उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई यांनी मा. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी केज यांना मौ. कौडगाव ता. केज ग्रामस्थांच्या तक्रारीच्या अनुषंगाने योग्य त्या कार्यवाहीचे पत्र संबंधीत यंत्रणेतील मा. उपविभागीय अभियंता, सा.बां. उपविभाग, केज, मा. गटविकास अधिकारी, पं.स. यांना पत्र देऊनही संबंधिताकडून कसलीही कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास आल्याने मौ. कोडगाव ग्रामस्थांनी तहसील कार्यालय केज समोर आमरण उपोषण करत असलेबाबत चे पत्र दि. 01.07.2020 रोजी मा. तहसीलदार केज यांना दिले. परंतु कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर उपोषण न करण्याची मा. तहसीलदार केज यांनी विनंती केल्यावरुन मौ. कौडगाव ग्रामस्थांनी तात्पुरते उपोषण स्थगित केले.

दरम्यान कोरोना परिस्थिती गंभीर झाल्याने सदर प्रकरणी प्रशासनाचे दुर्लक्ष झाले? किंवा जाणिवपुर्वक टाळाटाळ करण्यात आली ? हे अद्यापर्यंत उलगडलेले नाही. दरम्यानच्या कालावधीमध्ये संबंधित यंत्रणा व सांस्कृतिक भागृहाचे बांधकाम करणाऱ्या संस्था (एजन्सी) / गुत्तेदार यांनी कोरोना परिस्थतीचा गैरफायदा घेत सदर सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट व हीन दर्जाचे करुन अर्धवट आणि बोगस कामाची देयके दाखल करुन निधी लाटल्याचे समोर येत आहे. ही मौ. येथील ग्रामस्थांनी ब शासनाची घोर फसवणुक आहे. याबाबत वारंवार संबंधित यंत्रणेकडून पाठपूरावा करुनदेखील संबंधित यंत्रणेने आम्हा ग्रामस्थांच्या मागण्या व क्रारीची कोणतीही दखल घेतली नसून संबंधितांनी वरिष्ठांकडून आलेल्या आदेशाची ही अवहेलना केलेली आहे. तरी याद्वारे आपणाकडे सविनय तक्रार सादर करण्यात येते की, आपण आमच्या तक्रारीच्या अनुषंगाने योग्य ती दखल घेवुन आपल्या स्तरावरुन मौ. कौडगाव येथील खासदार निधीतून सांस्कृतिक सभागृहांच्या अत्यंत निकृष्ट व हिन दर्जाच्या, बोगस, नियमबाह्य बांधकामाची चौकशी करुन संबंधीत यंत्रणेतील दोषी व्यकतीविरुध्द कायदेशीर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली असून तत्काळ कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. या तक्रारीवर पत्रकार नवनाथ पौळ, अभिमान गायकवाड, रमाकांत गायकवाड,भारत गायकवाड, रमाबाई गायकवाड, शांताबाई गायकवाड, व्यंकटी गायकवाड,शारदा व्यंकटी गायकवाड, गणपत गायकवाड, भीमराव गायकवाड, प्रकाश पौळ यांच्यासह आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here