



✒️माधव शिंदे(नांदेड जिल्हा ,प्रतिनिधी)
नांदेड(दि.१७जानेवारी):- २०२२ रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व कन्या शाळा बरबडा यांच्यावतीने नवनिर्वाचित गटशिक्षणाधिकारी श्री. अशोक पवळे सरांचा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी पवळे सरांचे दोन्ही शाळेच्या वतीने शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी कुंटूर बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश पाटील उपस्थित होते. तसेच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक संभाजी आलेवाड, बरबडा केंद्राचे केंद्रप्रमुख रेडेवाड, केंद्र शाळेचे मुख्याध्यापक गुंटे , कन्या शाळेचे मुख्याध्यापक खंदारे तसेच जवाहरलाल नेहरू विद्यालय बरबडा येथील उपमुख्याध्यापक गणेश बडुरे उपस्थित होते.
राज्यस्तरीय गुणिजन शिक्षक पुरस्कार प्राप्त नागोराव तिप्पलवाड सर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले. केंद्राअंतर्गत सर्व शाळेचे मुख्याध्यापक यांनी गटशिक्षणाधिकारी पवळे सर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व सर्व शिक्षक वृंद यांनी सुद्धा पुष्पगुच्छ देऊन गटशिक्षणाधिकारी पवळे सरांचे अभिनंदन केले. याप्रसंगी इयत्ता तिसरीची कु. दुर्गा व्यंकटेश शेवाळे याविद्यार्थिनीने उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागतगीत गायनाने स्वागत केले. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्री रेडेवाड सरांनी केले व सूत्रसंचालन श्री मार्गेपवार गोविंद सरांनी केले तसेच केंद्रीय शाळेचे विभुते ,शिंदे, कुंभारगावे शिवदास , आलुरे, सौ. भैराट मॅडम, सौ. गुडसूरकर मॅडम व कन्या शाळेतील श्री कुंभारगावे प्रकाश , शेवाळे ,जेटेवाड ,सुरेवाड , सौ. करडखेले मॅडम व दत्ता अंबुलगे सर यांनी कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थित रित्या पार पाडले.


