Home महाराष्ट्र माजी नगराध्यक्ष छायाताई तुमाने यांच्या पतीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

माजी नगराध्यक्ष छायाताई तुमाने यांच्या पतीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

122
✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.17जानेवारी):-ब्रह्मपुरीच्या माजी नगराध्यक्ष छायाताई तूमाने यांच्या पतीने विहीरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील मालडोंगरी शेतशिवारात आज दि. 16 जानेवारी रोजी 12 वाजता च्या सुमारास घडली आहे.यामध्ये आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव पुरूषोत्तम तुमाणे वय 65 वर्ष रा. गुजरी वार्ड ब्रम्हपुरी असे आहे.प्राप्त माहितीनुसार, ब्रम्हपुरी शहरातील गुजरी वार्ड येथील रहिवासी असलेले पुरुषोत्तम तुमाने हे आज सकाळी 8 वाजता च्या सुमारास घरून निघून गेले.

त्यानंतर त्यांनी ब्रह्मपुरी शहरापासून सुमारे 2 किमी अंतरावर असलेल्या मालडोंगरी शेतशिवारातील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सदरची माहिती काही नागरिकांनी त्यांच्या कुटुंबीयांना कळवली तेव्हा कुटुंबातील व्यक्ती घटनास्थळी पोहचले व त्यांनी ओळख पटवली. मानसिक तणावामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.सदर घटनेचा सध्याचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश उंदीरवाडे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here