Home महाराष्ट्र हिवरखेड येथे ८९ लक्ष २९ हजार रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न !

हिवरखेड येथे ८९ लक्ष २९ हजार रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न !

229

🔹ग्रामीण भागात विकासाला गती देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध — आमदार देवेंद्र भुयार

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.16जानेवारी):-तालुक्यातील हिवरखेड येथे 15 व्या वित्त आयोग निधी व नागरी सुविधा आणि दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत ८९ लक्ष २९ हजार रुपयांच्या निधीची तरतुद करुन देण्यात आली असून या सर्व विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते पार पडला.शासनाच्या योजना गावांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करतांना गावातील गरजा आणि ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या ध्यानात घेऊन विकास कामे करण्याचा प्रयत्न असून ग्रामविकासाला चालना देण्यासाठी ग्रामीण भागात विविध पायाभूत सुविधांच्या उभारणीतून विकासाला गती देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी हिवरखेड येथे केले.

८९ लक्ष २९ हजार रुपये विकास निधी करून हिवरखेड येथे आठवडी बाजार सौंदर्यीकरण करणे करिता 3 लक्ष रुपये, स्मशानभूमी सौंदर्यीकरण करणे करिता 4 लक्ष रुपये, मुस्लिम कब्रस्तान सौंदर्यीकरण करणे करिता 4 लक्ष रुपये, समाज मंदिर सौंदर्यीकरण करणे करिता 4 लक्ष रुपये, गावात प्रत्येक घरी डस्टबिन वाटप करणे करिता 3 लक्ष रुपये, जि. प. शाळा दुरुस्ती करणे या कामाकरिता 3 लक्ष 50 हजार रुपये, ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत सि. ए. सी सेंटर बांधकाम करणे करिता 4 लक्ष रुपये, गावात सि.सि.टी.व्ही कॅमेरा बसविणे करिता 4 लक्ष रुपये, हिवरखेड गावातील मोफत नळ कनेक्शन जोडणे करिता 5 लक्ष रुपये, हिवरखेड येथील मच्छी मार्केट शेड सौंदर्यीकरण करणे करिता 3 लक्ष रुपये, गुजरी बाजार व गावातील शौचालय बांधकाम करणे करिता 7 लक्ष रुपये, इस्लामपुर व आजनपुरा वाढीव पाईप लाईन करिता 5 लक्ष 60 हजार रुपये, पेविंग ब्लॉक बसविणे या कामाकरिता 7 लक्ष 99 हजार रुपये, हिवरखेड येथे सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते व रपटे बांधकाम करणे या कामाकरिता 13 लक्ष 70 हजार रुपये, हिवरखेड गावातील नाली बांधकाम करणे या कामाकरिता 13 लक्ष 50 हजार रुपये, हिवरखेड गावात बेंच व गुजरी बाजार येथे हायमास्ट लाईट करिता 4 लक्ष रुपये निधीची तरतुद करुन भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार, हिवरखेड येथील लोक नियुक्त सरपंच विजय पाचारे,
उपसरपंच मंगेश पवार, सरपंच दापोरी सौ. संगीताताई ठाकरे, उपसरपंच दापोरी प्रभाकरराव तायवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, रमेश गुल्हाणे, ऍड. धनंजय तोटे, हरिमोहन ढोमणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रहीम कुरेशी, जमील कुरेशी, मनोहर आमले, मनोहर महल्ले, यश दंदाडे, कैलाश बारस्कर, नरेश वानखडे, ग्राम पंचायत सदस्य सुनीताताई अकोलकर,मंगलाताई ठाकरे, अर्चनाताई दाऱोकर, विजय डेहणकर, सुशांत निमकर, अनिल अमृते, योगेश धोटे,अनिकेत तडस तसेच ग्राम पंचयात सदस्य व हिवरखेड येथील नागरिक पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleMIM चा माजी जिल्हाध्यक्ष निघाला दर्ग्याचा जमीन चोर; गुन्हा दाखल!
Next articleअनधिकृत प्लेटिंग माफियांकडून प्लेटिंगची विक्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here