



✒️नायगांव प्रतिनिधि(हानमंत चंदनकर)मो:-8767514650
नायगाव(दि.16जानेवारी):-संजीवनी हॉस्पिटल नायगाव येथे रविवारी सांधेदुखी, संधिवात, मणक्याचे आजार व अस्थिरोग उपचार शिबिराचे आयोजन रविवार दिनांक १६ जानेवारी रोजी सकाळी ११ ते २ पर्यंतआयोजन करण्यात आले आहे.या मध्ये पत्रकार बांधवांची मोफत तपासणी केली जाणार आहे .नांदेड येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.अवधूत मोरे निर्मल हॉस्पिटल नांदेड यांच्या उपस्थितीत रविवारी दि.16 जानेवारी 2022 सकाळी 11.00 ते दु. 2 वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिरात हाडांची ठिसूळता तपासणी,शरीरातील युरिक एसिड तपासणी मोफत , हाडाच्या कर्करोगा संबंधीत माहिती व उपचार, गुडघे, माण, कंबर,पाठदुखी,सूज येणे, मणक्याचे आजार,जुने फ्रॅक्चर, हाडाचा कर्करोग आदी लक्षणे असणाऱ्या गरजू रुग्णांनी या शिबिराचा फायदा असे आवाहन संजीवनी हॉस्पिटल तर्फे करण्यात आले. पत्रकार बांधव व त्यांच्या कुटुंबासाठी ही सुविधा मोफत करण्यात येणार आहे.


