Home महाराष्ट्र बालरोगतज्ञ डॉ.धर्मकारे यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा

बालरोगतज्ञ डॉ.धर्मकारे यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा

106

🔹महसुल प्रशासनाचा आंदोलनकर्त्यांना पाठिंबा

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो;-9823995466

🔺शहर कडकडीत बंद ठेवून व्यापारी संघटनेने नोंदविला निषेध

उमरखेड (दि.15 जानेवारी)येथील शासकीय रुग्णालयातील कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत धर्मकारे यांचा भरदिवसा रहदारीच्या रस्त्यावर दि 11 जानेवारी रोजी सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास गोरखनाथ हॉटेल समोर एका युवकाने गोळीबार करून त्यांची हत्या केली.

या घटनेला 3 दिवस उलटूनही आरोपीचा सुगावा लागला नसल्याने उमरखेड येथील सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी काम बंद आंदोलन दि .13 जानेवारी पासून सुरू केले व आज दिनांक 15 जानेवारी रोजी उमरखेड शहारातील सर्व सामाजिक संघटने,व्यापारी संघटेने तसेच मेकीकल आणि डॉक्टर असोसिएशन संघटने डॉ. धर्मकारे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक करा.

या मागणीला धरून आज उमरखेड शहर बंदला पाठिंबा देत आपले प्रतिष्ठाने बंद ठेवून निषेध दर्शविला या बंदला उमरखेड शहाराती सर्व सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी पाठिंबा देऊन निषेध दर्शविला असुन उमरखेड शासकीय रुग्णालय ते तहसील कार्यालय पर्यंत शांततेत मोर्चा काढून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश मांडन, डॉ. श्रीराम रावते . डॉ. कीशोर राठोड .डॉ. आशिष उगले, डॉ. विवेक पत्रे, डॉ. डोंगे, डॉ.जब्बार पठाण, डॉ. अरुण बंग. डॉ. संजय तेला. डॉ. श्रीकांत जयस्वाल, व आदी डॉक्टर.व कर्मचारी उपस्थित होते.

या आंदोलनाला पाठिंबा देत उमरखेड तहसील चे तहसीलदार आनंद देऊलगावकर व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रवीण कुमार वानखेडे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राधेश्याम भट्टड, तलाठी गजानन सुरोशे, तसेच माजी आमदार विजयराव खडसे, राष्ट्रवादी चे राजूभैय्या जयस्वाल, युवक राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बबलू जाधव, शिवसेनेचे डॉ. विणकारे, शिवसेना शहर प्रमुख संदीप ठाकरे, सतीश कुबडे, आमदार नामदेव ससाणे, भाजपा शहर अध्यक्ष अजय बेदरकर,पुरोगामी चे प्रवक्ता शाहरुख पठाण, ज्ञानेश्वर लोखंडे, प्रहारचे तालुका उपाध्यक्ष गोपाल झाडे, अभिजित गंधेवार, व आदी सामाजिक संघटनेचे व राजकीय पक्षाचे,कार्यकर्ते मोर्चेत सहभागी होते .तसेच शिवसेनेचे शहर प्रमुख संदीप ठाकरे यांनी डॉ .धर्मकारे यांच्या पावन स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली वाहून मोर्चाची सांगता केली यावेळी शहरातील सर्व पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleजिवाजी महालेंच्या स्मृतिदिनानिमित्त नाभिक समाजातर्फे प्रतिमा पूजन…
Next articleकोरपना नगरपंचायत निवडणूक बाहेरच्या मतदारांनी पाठ फिरवली सत्ताधिशांना धक्का

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here