Home महाराष्ट्र जगदीश कुशारे आदर्श युवा शिक्षक पुरस्काराने सन्मानित

जगदीश कुशारे आदर्श युवा शिक्षक पुरस्काराने सन्मानित

279

🔸शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.15जानेवारी):-सावरगाव ता निफाड येथील सुप्रसिद्ध द्राक्ष उत्पादक तथा पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विद्यालयाचे आदर्श उपक्रम शिल शिक्षक जगदीश कुशारे यांना आदर्श युवा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब म्हसकर यांनी दिली आहे.

पिंपळगाव बसवंत येथे 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था व एज्युपरिवर्तन सर्व्हिसेस नाशिक आयोजित या वर्षीचा आदर्श युवा शिक्षक पुरस्कार पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विदयालयाचे उपक्रमशील शिक्षकपुरस्कार श्री जगदीश कुशारे सर यांना पिंपळगाव बसवंत येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.पुरस्काराचे स्वरूप सन्माचिन्ह, सन्मानपत्र, शाल ,श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
श्री जगदीश कुशारे सर यांचा शालेय उपक्रमाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असतो .त्यांनी ” चिमणी वाचवा अभियान” ,पर्यावरण संवर्धन , व्यसनमुक्ती, रुक्ष संवर्धन या विषयात अनेक व्याख्याने तसेच पत्रकारिता क्षेत्रात वर्तमानपत्रांच्या माध्यमातून विविध समर्पक लेखांच्या माध्यमातून जनजागृती करुन नावलौकिक मिळविला आहे .

तसेच या कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विदयालय शाळेतील विद्यार्थी आदित्य ढेपले याने विवेकानंद शिक्षण संस्था व एज्युपरिवर्तन सर्व्हिसेस नाशिक आयोजित वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला याबद्दल या दोघांचे अभिनंदन कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विदयालय स्कूल कमिटी अध्यक्ष श्री दिलीप नाना मोरे ,स्कूल कमिटी सर्व सदस्य, मुख्याध्यापक श्री भाऊसाहेब म्हसकर सर , सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here