




✒️प्रतिनिधी नेरी(नितीन पाटील)
नेरी(दि.14जानेवारी):-विदर्भाची पंढरी समजली जाणारी आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमीत दि 13 जाने ला घटस्थापना संपन्न होऊन 62 व्या गोंदेडा गुंफा यात्रा महोत्सवाची सुरवात झाली अनेक कार्यक्रमा रेलचेलीत भजन सध्याच्या कार्यक्रमांत परिसरातील अनेक भजन मंडळांनी भाग घेत वंदनीय राष्ट्रसंतानी लिहलेल्या आणि गायलेल्या भजनांच्या मेजवानीने संपुर्ण तपोभूमी भजनात रंगली वंदनीय राष्ट्रसंताच्या भजनांनी तपोभूमीत भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली .गुंफा महोत्सवात अनेक भजन मंडळांनी भाग घेतला असून शासनाच्या कोरोनाच्या नियमाचे पालन करून भजनसंध्या आयोजित करण्यात आली.
यात मास्क सॅनिटायसर आणि सुरक्षित अंतर ठेवून कमीत कमी गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत भजन संध्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .वंदनीय महाराजांच्या भजनांनी संपूर्ण तपोभूमी अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन भजनात रंगली या भजन संध्या मध्ये मंजुळा माता भजन मंडळ खांबाडा, मंजुळा माता भजन मंडळ बेलारा, गुरुदेव भजन मंडळ बोळधा, मातोश्री भजन मंडळ काजळसर ,मंजुळा माता महिला भजन मंडळ काजळसर ,आणि मंजुळामाता भजन मंडळ बोथली आदी भजन मंडळांनी या भजन संध्या मध्ये भाग घेऊन महाराजांच्या भजनाची सुरेल आवाजात गायन करून संपूर्ण तपोभूमीला भजनात रंगवून भक्ती सागराची निर्मिती केली. महिला आणि पुरुष भजन मंडळींनी भजनात चुरस निर्माण केली की या भक्तिमय महासागरात गुरुदेव भक्त आणि भाविक आकंठ बुडाले होते.




