



✒️राहुल डांगे(विशेष प्रतिनिधी)
गोंडपीपरी(दि.15जानेवारी):– विठ्ठल रुखमाई व हुनुमान मंदिर विठ्ठलवाडा याच्या वतीने ग्रामसफाई अभियान आयोजित केले होते.या अभियान जि प शाळा विठ्ठलवाडा व शिवाजी हायस्कूल विठ्ठलवाडा च्या सर्व विद्यार्थीनी सहभाग घेऊन गाव स्वच्छ केला व गावासमोर एक नवा आदर्श ठेवला.या वेळी विषय शिक्षक*गौतम उराडे, विठ्ठल गोंडे*यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग 6 वी,7वी च्या विद्यार्थाचे लेझीम पथक,कलश यात्रा तयार करून पूर्ण गावात प्रभातफेरी काढण्यात आली. लेझीम पथकातील सर्व विद्यार्थ्यांनी लुगडे धोतर घातले होते. सर्व गावकऱ्यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांचे मन भरून कौतुक केले.
चिमुकल्या विद्यार्थ्यांचा उत्साह,जोश पाहून गावातील प्रतिष्ठित नागरिक मान व्यंकटेश सावकार mallelwar याच्या कडून 500 रुपये, संजय वागदरकर सर यांचेकडून 500 रुपये, अविनाश दुर्गे यांच्याकडून 200 रुपये तर शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षा शाहुताई अवथरे यांचे कडून 200 रुपये असे एकूण 1400 रुपये बक्षिस मिळालं.यावेळी मुख्याध्यापक आवडे सर,विट्ठल गोंडे सर,गौतम उराडे सर यांनी सर्व गावकरी व विद्यार्थ्यांना ग्राम स्वच्छेतेचे महत्त्व पटवुन दिले.स्वच्छता ज्याच्या घरी उत्तम आरोग्य नांदेल घरोघरी असे विविध उदाहरणे देऊन स्वच्छतेचे महत्त्व समजावून दिले.यावेळी शाळेतील शिक्षक मोरे सर,उमरे सर,कोकुलवार सर,गेडाम सर,चौधरी मॅडम,तसेच शिवाजी शाळेचे प्राचार्य दुर्योधन सर,शेरकी सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
अशा प्रकारे आज विठ्ठलवाडा येथे लेझीम पथकाच्या साहाय्याने,गावकरी,युवक मित्र, विद्यार्थी यांच्या सहकार्याने ग्रामसफाई अभियान यशस्वी करण्यात आले.


