



✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)
नाशिक(दि.14जानेवारी):-चांदवड शहरातील स्व प्रदीप गुजराथी नगर सध्याचे महालक्ष्मी नगर हा बस स्टँड मागील परिसर अस्तित्वात येऊन जवळपास 13 ते 14 वर्ष झालीत.सुरुवातीस मोजकीच 7-8 घरे असल्याने सोयीसुविधा होतील ही अपेक्षाच नव्हती.मात्र 2015 पासून 80 ते 90 घरे झाल्यानंतर सुद्धा या भागात अजूनही चांदवड नगरपरिषदेने अद्याप ही गटारींची सुविधा केलेली नाही.सध्या झालेल्या डांबरी रस्त्यांमुळे घरे खाली व रस्ता उंच अशी भयानक आजची परिस्थिती झालीआहे.
त्यामुळे प्रचंड पाणी काही घरासमोर साचत असुन यात पाण्याचा निचरा न झाल्याने डास निर्माण होत आहेत.आमच्या प्रतिनिधीने घेतलेल्या माहितीनुसार येथील रहिवासी श्री उदय वायकोळे यांनी सन 2016 पासून गटारी व पाणीपुरवठा याबाबत पत्रव्यवहार केल्याचे दिसून येते मात्र तब्बल 5 वर्षे होऊनही गटार अथवा पाणीपुरवठा अद्यापही झालेला नाही यावरून नगरपरिषदेचे काम किती जोरात सुरू आहे हे समजते.


