Home महाराष्ट्र मोर्शी येथे मराठा सेवा संघातर्फे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी...

मोर्शी येथे मराठा सेवा संघातर्फे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी !

288

🔸दापोरी येथील जी प शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी केले जिजाऊ चरित्राचे मार्गदर्शन !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.13जानेवारी):-तालुका मराठा सेवा संघ व जिजाऊ सेवा संघ यांच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती बुधवार दि.१२ जानेवारी रोजी भारतीय महाविद्यालय मोर्शी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.महाराष्ट्राला दोन छत्रपती देणारे तथा ताठ मानेने जगता यावे म्हणून स्वराज्याची संकल्पना उदयास आनणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती उत्सव दिनानिमित्त मोर्शी येथे उत्स्फूर्तपणे जयंती उत्सव
साजरा करण्यात आला.

या वेळी मान्यवरांच्या शुभहस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कोरोनाचा पार्श्वभूमीवर नियम पाळत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना घडविण्यात राष्ट्रमाता जिजाऊसारखी दूरदृष्टी आजच्या सर्व मातांनी ठेवली तर आमच्याही घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूरवीर निर्माण होतील असे प्रतिपादन कु श्रेया नरेंद्र अंधारे यांनी केले,दापोरी येथील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनी कु नम्रता केदारे, कु भक्ती मिरासे, कु उन्नती राऊत यांनी राष्ट्रमाता जिजाऊ ही इतिहास घडविणारी एक महान स्त्री झाली होती.

स्वराज्य निर्माण करण्यासाठी गोरगरिब, शेतकर्‍यांवर विविध जाती धर्माच्या मराठी मावळ्यांवर दया दाखविणारी कारूण्यमूर्ती होती. त्यामुळेच शिवाजी महाराजाच्या कृतीतून कार्य सिध्दीस नेण्यासाठी लागणारी प्रेरणामूर्ती जिजामाता होती असे प्रतिपादन केले.यावेळी विविध मान्यवरांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत सर्वांनी माँसाहेब जिजाऊ च्या चरित्राचे मार्गदर्शन करून आपल्या कुटुंबातील महिलांना जिजाऊंची प्रेरणा देऊन स्वकर्तुत्वाने जगण्याची ताकत द्यावी असे संबोधित केले.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनीता कोहळे, प्रमुख वक्त्या प्रतिभा घटोळ, प्रमुख मार्गदर्शक शिवश्री हरिदास गेडाम, जाणे सर, शरद विधळे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष डॉ संदीप राऊत, जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्ष शारदा विधळे, मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष संदीप रोडे, सचिव श्रीकांत देशमुख, मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष रुपेश वाळके, निखिल चिखले, गजानन चौधरी, म्हाला सर, जिजाऊ ब्रिगेडच्या दीपाली विधळे, अर्चना विघे, सोनाली खोपे, चित्रा अंबाडकर, डॉ ग्रीष्मा मुळे, छाया वानखडे यांच्यास मराठा सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मृदुला वानखडे यांनी केले तर आभार वृषाली नागपुरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here