



✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.13जानेवारी):-आज दिनांक 13/1/2022 रोजी माननीय श्री संजयभाऊ गजपुरे यांच्या अध्यक्षते खाली रुग्णकल्याण समितीची बैठक पार पडली.त्या बैठकी चे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र मौशी येते वृक्षारोपण चा कार्यक्रम घेण्यात आला.
त्या कार्यक्रमात जि.प.सदस्य तथा रुग्णकल्याण समिती अध्यक्ष श्री संजयभाऊ गजपुरे, डॉ. सागर माकडे वैधकीय अधिकारी, डॉ. अश्विनी रामटेके वैधकीय अधिकारी, मौशी चे सरपंच सौ. संगीता करकाडे, मेंढा चे सरपंच श्री आनंदराव कोरे, श्री अरुण मानापुरे, श्री रामकृष्ण देशमुख, श्री वामनराव तलमले, श्री भीमरावजी मेश्राम,कार्यक्रमाचे चे संचालन मारोती मडावी आरोग्य सहाय्यक यांनी केले तसेच आभारप्रदर्शन अनिल रावेकर आरोग्य सहाय्यक यांनी केले त्या कार्यक्रमात संपूर्ण आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.


