Home महाराष्ट्र आष्टी तालुका मुप्टा संघटनेची सहविचार सभा संपन्न

आष्टी तालुका मुप्टा संघटनेची सहविचार सभा संपन्न

296

🔸शिक्षक व प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी झगडणारी एकमेव संघटना – प्रा.प्रदिप रोडे

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.13जानेवारी):-वंतालुका मुप्टा संघटनेची सहविचार सभा दि.१२ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ६ वा.जगताप क्लासेस,मार्केट यार्ड,आष्टी येथे संघटनेचे सक्रीय सभासद तथा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेंद्र लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या सहविचार सभेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुप्टा संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे,मुप्टा संघटनेचे उर्दु विभागाचे राज्यसचिव शाहेद कादरी,मुप्टा संघटनेचे जेष्ठ नेते प्रा.राम गायकवाड,प्राचार्य सुनिल शिंदे उपस्थित होते.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुप्टा संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे यांनी संघटनेची स्थापना,संघटनेने आजतागायत केलेली कामे,कोरोना काळात मृत पावलेल्या सभासदांना केलेली आर्थिक मदत,संघटना बांधणी संदर्भात तसेच शिक्षक व प्राध्यापकांच्या समस्या बाबत सविस्तर माहिती देवून शिक्षक व प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी झगडणारी मुप्टा ही एकमेव संघटना आहे असे सांगून रविवार दि.१६ जानेवारी २०२२ रोजी स.११ वा.तुलसी इंग्लिश स्कूल,संत ज्ञानेश्वर नगर,शासकीय आयटीआय मागे बीड येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी प्रथमतः माँ.जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले.तद्नंतर सहविचार सभेचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक यांचा आष्टी तालुका मुप्टा संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.मुप्टा संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीरंग पवार यांनी सहविचार सभेचे प्रास्तविक केले.प्रास्तविकात त्यांनी आजपर्यंत आष्टी मुप्टा ने केलेल्या कार्याचा लेखाजोका मांडला.तसेच संघटनात्मक बांधणी,शिक्षक व प्राध्यापकांच्या विविध समस्या निराकारणाबाबत सखोल माहिती दिली.

तसेच यावेळी प्रा.राम गायकवाड यांनी संघटनेची ध्येय धोरणे,संघटना काय असते व काय करु शकते याबाबत मार्गदर्शन केले.मुप्टा संघटनेचे उर्दु विभागाचे राज्यसचिव शाहेद कादरी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की,उर्दु विभाग राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात मोठ्या जोमाने व ताकदीने काम करत असून उर्दु विभागातील शिक्षक व प्राध्यापकांच्या समस्या निराकारण करण्यासाठी मोठा लढा देत असून अनेक प्रश्नांचा उहापोह करुन अनेक प्रश्न तात्काळ सोडविलेले आहेत.यामुळेच मुप्टा संघटना ही एक मोठी ताकद असून यामध्ये सर्वांनी सामील होण्याची अत्यंत गरज आहे.तसेच याप्रसंगी प्राचार्य सुनिल शिंदे यांनी मुप्टा संघटनेत सामील होवून तन,मन,धनाने सहकार्य करावे असे आवाहन केले.

शेवटी अध्यक्षीय समारोपात राजेंद्र लाड यांनी सांगितले की,मुप्टा ही संघटना नसून ही एक शिक्षक व प्राध्यापकांच्या समस्या सोडविणारी चळवळ आहे.या चळवळीत शिक्षक व प्राध्यापकांनी तन,मन,धनाने सामील व्हावे.वेगवेगळ्या कार्यालयात मुप्टा संघटना म्हटले की,नावानेच कित्येक कामे होतात.एवढी मोठी ताकद मुप्टा संघटनेने निर्माण केलेली आहे.यामुळेच बीड जिल्ह्यातील अनेक प्राध्यापकांची व शिक्षकांची कामे पूर्णत्वास गेलेली आहेत.तेंव्हा अशा एका कर्तव्यदक्ष संघटनेत सर्वांनी सामील होवून आपले प्रश्न सोडवून घ्यावेत असेही आवाहन राजेंद्र लाड यांनी शेवटी केले.

या सहविचार सभेचे बहारदार सुत्रसंचलन प्रा.नामदेव वाघुले यांनी केले तर आभार प्रा.सय्यद बशिर यांनी मानले.सदरील सहविचार सभेस प्रा.बाळासाहेब काकडे,प्रा.डाँ.एस.डी.ओव्हाळ,स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुभाष भादवे,ए.आर.पाचारणे,किरण खंडागळे,आर.एम.निकाळजे,प्रा.ए.एन.गायकवाड,प्रा.आर.के.सोनवणे,भा.द.जगताप,पत्रकार आण्णासाहेब साबळे आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.संघटनेच्या कार्यक्रमासाठी हाँल उपलब्ध करुन दिल्याबद्दल भा.द.जगताप यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.सहविचार सभेत कोवीडचे सर्व नियम पाळण्यात आले.शेवटी चहापान घेवून सहविचार सभा संपन्न झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here