



🔹प्रा शिवराज बागंर यांची तात्काळ सुटका करावी–दलित पँथर
✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)
बीड(दि.13जानेवारी):-वंचित बहुजन आघाडीचे, उसतोड संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे माजी बीड जिल्हा अध्यक्ष प्रा शिवराज बांगर पाटील यांना मुंबई मधुन अटक केली, माझ्या सारख्या हजारो युवकांना प्रश्न पडला प्रा शिवराज बांगर साहेब यांनी नेमका काय गुन्हा केला असावा, हा प्रश्न पडत आसतानांच अचानक सोशलमिडीया वर पोस्ट बघीतली बीड जिल्हा अधीकारी साहेबांनी प्रा शिवराज बांगर पाटील यांच्या वर झोपडपट्टी दादा MPDA म्हणुन गुन्हा दाखल केला, बीड जिल्हा आधीकार्यांनी एवढी भयान कार्यवाही केली की बीड जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र हादरला, जो व्यक्ती झोपडपट्टी असो किंवा ग्रामीण भाग असो अशा वसत्यांन मध्ये जाऊन गरजवतुंना मायचा हाक देऊन मदत करणारा व्यक्ती झोपडपट्टीचा दादा कसा काय होऊ शकतो?
विचार करण्याचा विषय आहे हा, लाॅकडाऊन मध्ये शेकडो कुटुंबाला मदत करणारा व्यक्ती झोपडपट्टीचा दादा कसा काय असु शकतो, MPDA ही अशी भयान कार्यवाही करून प्रा शिवराज बांगर पाटील यांच राजकीय जिवनच नव्हे तर सामाजिक जिवन देखील संपुष्टात एईल त्यामुळे अशे पाप बीड जिल्हा अधीकारी साहेबांनी करू नये, ही कार्यवाही राजकीय हेतु पोटी केल्याली आहे, अशे आमचे म्हणणे आहे, यापुढे बीड जिल्ह्यातील कोणत्याही राजकीय पक्षाचा जिल्हा अध्यक्ष प्रस्थापितांन विरोधात बोलायला धरधर कापेल जर आपण बोलोत तर आपलाही शिवराज बांगर होईल, आपल्यावर ही MPDA सारखी कार्यवाही होईल, त्यामुळे आम्ही बीड जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या पदाअधीकार्यांना आव्हान करत आहोत आपला जर प्रा शिवराज बांगर पाटील होऊ देयचा नसेल तर राजकीय हेतु बाजुला ठेवुन प्रा शिवराज बांगर पाटील यांच्या समर्थनात रस्त्यावर उतरले पाहिजे, कलेक्टर, तहसिलदार पोलीस प्रशासनास धारेवर धरले पाहिजे, नाहीतर झोपडपट्टी दादा MPDA कार्यवाहीचा नंबर तुमच्या मधुनच कुनाचा तरी असु शकतो.
बीड जिल्ह्यातील सत्ताधारी हे चळवळीत काम करणारया कार्यकर्त्याना संपवु पाहत आहेत.प्रा शिवराज बागंर पाटील यांना अटक करण्यामागे बीड जिल्हयातील खुप मोठया नेत्याचा हात असुन या नेत्याला आगामी काळात गोरगरीब जनता जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही असा ईशारा दलित युथ पँथरचे बीड जिल्हा अध्यक्ष तथा मराठवाडा सचिव पवन कुचेकर यांनी दिला आहे


