Home महाराष्ट्र प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूरच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूरच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

273

✒️लातूर(पुरोगामी  न्युज नेटवर्क)

लातूर(दि.13जानेवारी):-राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य शाखा लातूरच्या वतीने नुकतीच सजरी करण्यात आली. याप्रसंगी संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा वैशालीताई पाटील,जिल्हा उपाध्यक्ष महादेव पोलदासे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संतोष सोनवणे, श्रीकांत चलवाड, हिल्या कस्पटे, विवेक मुळजे, सुरज माडदेवड, गणेश बारवाड, निकिता पिटलवाड, प्रतिक्षा पिटले, आदी पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांनी स्वामी विवेकानंद यांचे जीवनकार्यावर प्रकाश टाकला. तर महिला जिल्हाध्यक्षा वैशालीताई पाटील यांनी राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ यांचे जीवन व कार्य समजावून सांगितले. तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे महाराष्ट्रात सुरू असलेल्या उत्कृष्ट कार्याची माहिती देण्यात आली. जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संतोष सोनवणे यांनी उपस्थित पदाधिकारी व मान्यवरांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here