Home महाराष्ट्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भोसीकर यांचे राजकारण सुडबुद्धीचे- भास्कर भिलवंडेनी केला पत्रकार परिषदेत खुलासा

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भोसीकर यांचे राजकारण सुडबुद्धीचे- भास्कर भिलवंडेनी केला पत्रकार परिषदेत खुलासा

365

✒️हानमंत चंदनकर(नायगाव प्रतिनिधी)मो:-87675 14650

नायगाव(दि.13जानेवारी):-गत 13 वर्षापासून आपण एकनिष्ठ राष्ट्रवादी पक्षात काम करीत पक्षवाढीसाठी मोठे योगदान देऊनही आणि नांदेड जिल्ह्यात पक्ष पडतीच्या काळात देखील न खचता राहूनही आपल्यावर कुठल्याही प्रकारची शिस्तभंगाची नोटीस न देता नायगाव तालुका अध्यक्ष पदावरून कार्यमुक्त करून हकालपट्टी या अवमान जनक शब्दाचा वापर जिल्हाध्यक्ष भोसीकर यांनी केले, हे सूडबुद्धी चे राजकारण होय असा खुलासा भास्कर पा. भिलवडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

सलग 13 वर्षे आपण पक्षात काम करीत असल्याने जिल्हाध्यक्ष पदासाठी आपण दावेदार ठरू शकतो या अधिकाराने राष्ट्रवादीचे तत्कालीन तालुकाध्यक्ष भास्कर पा.भिलवंडे यांनी ही मागणी केल्याने हरिहरराव भोशीकर यांना अडथळा वाटू लागला हे मुख्य कारण असले तरी हे कारण तसेच मनात ठेवून भिलवंडे यांच्या कार्यप्रणालीकडे भोशिकर बोट दाखवीत नायगाव नगरपंचायत निवडणूकीत उमेदवार का उभे केले नाही, तर भिलवंडेनी खुलासा देताना वास्तविकता दाखवित म्हणाले की, या निवडणुकी दरम्यान माझे वडील ज्येष्ठ साहित्यिक भगवानराव भिलवंडे यांचे दुःखद निधन झाले होते व उमेदवारीसाठी अवधी कमी असतानाही माझ्या घरचा दुखवटा संपल्या दुसऱ्या दिवशीच नायगाव येथे बैठक लावून नायगाव नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी आपण दहा लाख रुपये देण्याची घोषणा केली.

परंतु जिल्हा अध्यक्ष महोदय भोसीकर यांनी हे अमान्य करीत पक्षाकडून आर्थिक मदत तर सोडाच पण झेंडे, दस्ती देखील मिळणार नाही म्हणून खिल्ली उडवली. आणि वास्तविक पाहता सदर निवडणूक ही शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जाते यासाठी आपण पाच महिन्यापूर्वी जिल्हाध्यक्ष यांना नायगाव शहराध्यक्ष पदासाठी निवड करावी अशी विनंती करूनही नियुक्ती केली नाही. माझ्या जन्मदात्या वडिलांचे निधन झाले असतानाही मी नायगाव नगरपंचायत निवडणूक साठी तयार असतानाही जिल्हाध्यक्ष भोशीकर यांनी तिलांजली देत माझ्या कार्यप्रणालीवर खापर फोडून मला तालुका अध्यक्षपदावरून हकालपट्टी केल्याची प्रेस नोट काढली हा अवमान जनक शब्द वापरले, शिस्तभंगाची नोटीस न देणे, जाहीररीत्या खुलासा न करणे, म्हणजे हरिहरराव भोशिकर यांचे हे राजकारण सुड बुद्धीचे आहे असा सणसणीत खुलासा भास्कर पाटील भिलवंडे यांनी नरसी येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत केला असून यावेळी भाऊसाहेब चव्हाण, गंगाराम नवारे, रघुनाथ सोनकांबळे, कैलास भालेराव, गजानन पा. होटाळकर,देविदास सूर्यवंशी, श्‍याम पा. चोंडे, संजय पा. चव्हाण, जिगळेकर, जळबा सुर्यवंशी, माधव कोरे, यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

…………….,……….
सदर निवडणुकीदरम्यान आपल्या वडिलांचे निधन झाले असतानाही आपण पक्षासाठी अतिशय प्रामाणिकपणे काम करताना माझ्यावर सुडबुद्धीचे राजकारण जिल्हाध्यक्षांनी का करावे हा प्रश्न उपस्थित करीत भास्कर पाटील भिलवंडे अतिशय भावूक होऊन त्यांना आपले अश्रू आवरता आले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here