Home महाराष्ट्र राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे पूजन…

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे पूजन…

290

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

धरणगाव(दि.12जानेवारी): — येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुल येथे राजमाता माँसाहेब जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले.सर्वप्रथम राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे यांनी तर युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला शाखा व्यवस्थापक जगन गावित यांनी माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. शिक्षिका ग्रीष्मा पाटील यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती सांगितली. स्वराज्याची खरी प्रेरणा व छत्रपती शिवरायांच्या खऱ्या गुरू माँसाहेब जिजाऊ आहेत.

आपल्या मुलांमध्ये जिजाऊंचे संस्कार जोपर्यंत आपण रुजवणार नाहीत तोपर्यंत शिवबा राजे घडणार नाहीत. आजच्या नव्या पिढीतील युवकांनी स्वामी विवेकानंद यांचा आदर्श घेऊन मार्गक्रमण केले पाहिजे, असे प्रतिपादन ग्रीष्मा पाटील यांनी केले. कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, माध्यमिक च्या मुख्याध्यापिका नाजनिन शेख, शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, रमिला गावित, ग्रीष्मा पाटील, गायत्री सोनवणे, दामिनी पगारिया, शिरीन खाटीक, हर्षाली पुरभे, पुष्पलता भदाणे, शिक्षक अमोल सोनार, लक्ष्मण पाटील यांच्यासह शितल सोनवणे, सरला पाटील, इंद्रसिंग पावरा हे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here