



✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.12जानेवारी):-कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बीडच्या आरोग्य विभागाने लसीकरण मोहीम जलद केली आहे. मात्र, लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने, लसीकरण केंद्र आता कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बीड जिल्हा रुग्णालयात बूस्टर डोस, विद्यार्थ्यांचे लसीकरण यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. यावेळी अनेक जण विना मास्क देखील आढळून येतात.या ठिकाणी ना कोणतं सोशल डिस्टन्स, ना कोविडचे नियम पाळले जात आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रावरील गर्दी कोरोनाचे हॉटस्पॉटसह सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.


