Home महाराष्ट्र वर्धापन दिनानिमित्त डॅश ग्रुप चे कार्य कौतुकास्पद

वर्धापन दिनानिमित्त डॅश ग्रुप चे कार्य कौतुकास्पद

88

✒️सुरेश राठोड(कोल्हापूर प्रतिनिधी)

कोल्हापूर(दि.12जानेवारी):-ज्योतिबा च्या पायथ्याशी आई महालक्ष्मी च्या पदस्पर्शाने पावन झालेल्या करवीर नगरीतील सुप्रसिद्ध असे मंडळ डॅश ग्रुप होय, या मंडळाची स्थापना होऊन आज सत्तावीस वर्ष पूर्ण झाली. याचेच औचित्य राखून ग्रुपने कळंबा जेल समोर 27 वा वर्धापन दिन साजरा करून कळंबा जेल येथे अनेक लोकांना थंडी पासून संरक्षण व्हावे म्हणून शहरातील विविध ठिकाणी असलेल्या गरजू व गरीबांना ब्लँकेट वाटप केले.

डॅश ग्रुप तर्फे गेले 27 वर्षे विविध कार्यक्रम आयोजित केली जातात त्यात शारदीय नवरात्र उस्तव, गणेश उत्सव, दर वर्षी कुंकूमार्चन, महाप्रसादाचे आयोजन, छत्रपती संभाजी महाराज जयंती, विभागातील आर्मी जॉईन झाल्याला तरूणाचा सत्कार, शालेय गुणी विद्यार्थ्यांना सत्कार, शालेत पुस्तके वाटप, वयोवृध्द मध्ये दर वर्षी फळे वाटप, पूरग्रस्तांना मदत, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा असे उपक्रम डॅश ग्रुप तर्फे दर वर्षी घेतले जातात काल झालाल्य वर्धापन दिनाचे औचित्य साधून ब्लँकेट वाटप करण्यात आले.

या वेळी मंडलाचे संस्थापक अध्यक्ष किरण महाडेश्वर, अय्याज नगारजी, सनी महाडेश्वर, तुषार जाधव, शुभम भेसले,विशाल पाटील अभिजीत यादव मयुरेश माने,व मंडलाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here