




🔸मध्यप्रदेश राज्यातील शांती फाऊंडेशन मार्फत राष्ट्रीय युवा दिन साजरा
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.12जानेवारी):-अखंड भारतातील सर्व युवकांचे प्रेरणास्थान, असंख्य युवकांना विविध क्षेत्रात मोलाचे मार्गदर्शन करणारे जगविख्यात आदरणीय स्वामी विवेकानंद यांची आज 12 जानेवारीला 151 वी जयंती हा दिवस आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय युवक दिन म्हणून सरकारने घोषित केले आहे. विविध शाळेत, महाविद्यालयात, अनेक संस्थानमध्ये युवकांना त्यांचे व्यासपीठ मिळावे आणि त्यातून त्यांच्या जीवनात काहीतरी नवीन स्थान निर्माण करण्यास मदत व्हावी, ह्यासाठी युवकांना प्रोत्साहीत करून 12 जानेवारी स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त, राष्ट्रीय युवा दिन मोठ्या उत्साहाने अनेक ठिकाणी साजरा केला जात असतो.
ह्याच दिनाचे औचित्य साधून, आज उत्तरप्रदेश राज्यातील गोंदा शहरामधील नावाजलेली सामाजिक संस्था “शांती फाऊंडेशन” मार्फत गुगल मीठ अप्लिकेशन द्वारा ऑनलाइन वेबमिनार घेऊन, राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. ह्या वेबमिनार मध्ये भारतातील अनेक राज्यातील जवळपास 650 पेक्षा जास्त विविध क्षेत्रातील युवक वर्ग सहभागी झाले होते. त्यांमधून काही निवडक 100 युवकांचा, त्यांची विशेष कार्यप्रणाली पाहून त्यांना “स्वामी विवेकानंद सन्मान-2022” हा राष्ट्रीय सन्मान देऊन गौरविण्यात आले. सदर ऑनलाइन सोहळ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरीचे युवा सामाजिक कार्यकर्ते उदयकुमार सुरेश पगाडे यांना सामाजिक क्षेत्रातील विशेष कामगिरी बद्धल “स्वामी विवेकानंद सन्मान-2022” हा राष्ट्रीय सन्मान देऊन गौरविण्यात आले. ह्या विशेष ऑनलाइन सन्मान सोहळ्याला पद्मश्री डॉ.विजयकुमार शाह आणि शांती फाऊंडेशनचे सर्व कार्यकारणी हजर होते.




