Home Education इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे १५ ते १८ वयोगटातील...

इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे १५ ते १८ वयोगटातील मुलांमुलींचा लसीकरण शुभारंभ…….

304

🔹इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या ७५०च्या वर विद्यार्थी झाले लसवंत

🔸आदर्श माध्यमिक विद्यालयातही झाले ९० टक्के लसीकरण

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

धरणगाव(दि 12जानेवारी):- इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धरणगाव व आदर्श माध्यमिक विद्यालय धरणगाव येथील शाळेत 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना कोविड लसीकरणाचा शुभारंभ दि. ११ रोजी करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका सौ सुरेखा एस पाटील,पर्यवेक्षक ए एस पाटील व आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बळवंत पाटील व सर्वशिक्षक उपस्थित होते.इयत्ता ९वी ते १२ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले साधारणपणे जवळपास ७५० विद्यार्थ्यांचे या वेळी लसीकरणाचा लाभ घेतलाआदर्श माध्यमिक विद्यालयातही नव्वद टक्के विद्यार्थ्यांना देखील या लसीकरणाचा लाभ घेता आला आहे.कोरोनाच्या तिसरी लाटेचा सामना करण्यासाठी विद्यालयातील तरूणाई आता सज्ज झाली आहे

लसीकरण वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुर जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य साहाय्यक पी एस भदाणे,श्रीमती डी बी मोरावकर(आरोग्य सहाय्यिका) व श्रीमती के पी विसपुते यांनी प्रत्यक्ष कोव्हॅक्सिन लस दिली. आर के देशमुख आरोग्य सेवक, महेंद्र माळी(आरोग्य सेवक), दिनेश बडगुजर फार्मासिस्ट, किरण चौधरी डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचे सहकार्य लाभले.या लसीकरणाच्या शुभारंभ प्रसंगी संस्थेचे सचिव सी के पाटील हे उपस्थित होते या लसीकरणाच्या शिबिराला संस्थेचे चेअरमन डी जी पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत व शंभर टक्के लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here