



✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)
धुळे(दि.12जानेवारी):-दि.11/1/2022रोजी आज नवीन वर्षाची सुरूवात दारूबंदी च्या कार्याने करतांना खुप दिवसापासून वडणे गावातील दारूबंदी साठी, गावात विविध सामाजिक जनजागृति व्हावी यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे मनोहर भाऊ कोळी व वडणे गावातील महीलांच्या निमंत्रण वरून मिळेल त्या वाहनाने धुळे पासून 35किमी लांब असलेल्या वडणे गावी साडेचारला पोहचली….
ग्रामीण भागात घरोघरी महीला सकाळपासून शेतात गेलेल्या असतात… त्यामुळे संध्याकाळी पाच वाजता घराकडे परततात… गावात गेले तेव्हा गावातील पोलीस पाटील अमोल कोळी, मनोहर कोळी, ग्रामपंचायत शिपाई पुंडलिक दादा, शिंदे बापू, देवकाताई, उषाबाई कोळी सोनुभाऊ, सचिन भाऊ सर्वांनी घरोघरी फिरून महीलांना गीतांजली ताईंची मंदीरात दारूबंदी ची सभा असल्याची माहीती दिली…
शेतातुन दमलेल्या थकलेल्या महीला असूनही दारूबंदी साठी लगबगीने विठ्ठल मंदीरात सभेच्या ठिकाणी पोहचल्या…याचे खरच खुप कौतुक वाटले…महीला सांगत होत्या आमच्या समस्या ऐकून घेण्यासाठी कोणीही कधीच येत नाही ताई तुम्ही पहिल्यांदा आल्या याचा आम्हाला खुप आनंद झाला व अभिमान वाटतो आहे…जवळपास सात वाजेपर्यत मी दारूबंदी, विविध समस्या वेगवेगळी सामाजिक जनजागृति,महीलांसाठी कायदेशीर जनजागृति आदीवासी ंच्या योजना, जाँब कार्ड,ई श्रम कार्ड,करोना जनजागृति,यावर बोलत होती… महीला प्रश्नांची उत्तरे विचारत होत्या मी माहीती सांगत होती… विश्वास आत्मविश्वास जागवत होती….
कडाक्याचा गारठा वाढला परंतु वरणे गावातील माझ्या तीन तासाच्या दौ-यात महीलांचा व युवकांच्या आत्मविश्वास कित्येक पटीने वाढला त्यांच्या मनात सामाजिक जाणिवेच बीज पेरून मी सर्वांचा निरोप घेऊन2022या नववर्षाच्या पहिल्या माझ्या दारूबंदी च्या कार्याला, सामाजिक दायित्व ला नवीन गावात सुरूवात करून समाधानाने धुळ्याकडे परत निघाले.
सौ गीतांजली कोळी.धुळे
प्रमुख- महाराष्ट्र दारूबंदी महीला/ युवा मोर्चा
मार्गदर्शक-वाल्या सेना
गृप खान्देश


