Home महाराष्ट्र ब्रम्हपुरी येथे विपणन विषयक जिल्हास्तरावरुन एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

ब्रम्हपुरी येथे विपणन विषयक जिल्हास्तरावरुन एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

86

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.12जानेवारी):- दिनांक 8 जानेवारी रोज शनिवारला संत गाडगेबाबा सभागृह , पंचायत समिती ब्रम्हपुरी येथे विपणन विषयक जिल्हास्तरावरुन एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेकरिता मार्गदर्शक म्हणून श्री शशिकांत ल. मोकासे उपस्थित होते. त्यांनी उपस्थित महिलांना उद्योग, बाजारपेठ, नवनविन संधी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच व्यवसाय करतांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या व त्यावर उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. अभियानाच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता समूह, ग्रामसंघ व प्रभागसंघ यांना कोणकोणते व्यवसाय करता येईल यावर मार्गदर्शन केले.

तसेच छोटेछोटे व्यवसाय सुरु असतील त्यांना कशाप्रकारे मोठे करता येईल व इतरांना कश्याप्रकारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन मोठे यशस्वी उद्योजक बनता येईल याबाबत श्री शशिकांत ल. मोकासे मार्गदर्शन केले.सदर प्रशिक्षणाला तालुका अभियान कक्ष, पंचायत समिती ब्रम्हपुरी ची सर्व टीम, उद्योग सुरु असलेल्या महिला तसेच नविन उद्योग सुरु करू इच्छीणाऱ्या महिला नवउद्योजक महिला यांनी सहभाग घेतला व कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here