Home महाराष्ट्र गेवराई शेवगाव रोडवर ऊस वाहतूक करणारे ट्रेलर पलटी होत असल्याने प्रवाशांच्या जिवितास...

गेवराई शेवगाव रोडवर ऊस वाहतूक करणारे ट्रेलर पलटी होत असल्याने प्रवाशांच्या जिवितास धोका, शेतकऱ्यांचेही होतेय प्रचंड नुकसान

373

🔹शेवगाव फाटा ते सुकळी फाटा २४ किमी पूर्णत: खड्डेमय

🔸गरोधर महिलेस उपचारासाठी घेवुन जात असतांना खड्डेमय रस्त्यामुळे मधेच प्रसूती होते

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.12जानेवारी):- तालुक्यातुन जाणारा नाशिक राज्यमार्ग क्र. ४४ हा पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याशी जोडनारा असून बेलगाव,रामनगर तांडा, गौंडगाव, धोंडराई, तळणेवाडी, भोजगाव, बोरीपिंपळगाव, उमापूर, राक्षसभुवन, पंचाळेश्वर, मालेगाव, खळेगाव, माटेगाव, गायकवाड जळगाव, महार टाकळी, चकलांबा ईत्यादी गावांना जोडणारा जवळपास २४ किमी अंतराचा असून या रोडची दुर्गमभागातील रस्त्याप्रमाणे दयनिय अवस्था मागील दोन दशकापासून आहे.पुढे हाच गेवराई शेवगाव रोड बालमटाकळी, बोधेगाव, चापडग, शेवगाव, नेवासा, शिर्डी, अहमदनगर, पुणे, मुंबई या शहराकडे जातो या रस्त्यावर मालवाहतूक वाहनांसह चारचाकी व दुचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते.

रोड पूर्णत: उखडा असून रोडची खडी मोकळी झालेली आहे आवजड वाहने रोडवरून जात असतांना टायरचा कट बसल्याने खडीचे दगड बंदुकीच्या गोळीच्या वेगाने उडतात यामुळे अनेकांना हात, पाय, डोक्याला दगड लागून गंभीर जखमा झाल्या होतात.सुकळी फाटा ते शेवगाव फाटा या गेवराई विधानसभा मतदार संघातून जाणार्या रस्त्यावर गुडघ्या एवढी खड्डे असल्याने गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी गेवराई किंवा बीडला घेवुन जातांना मध्येच प्रसूती होत असल्याने त्या नवजात बालकाच्या व मातेच्या जिवाला धोका निर्माण होत आहे.
रस्ता पुर्णत: खड्डेमय असल्याने खड्याचा अंदाज न आल्याने अपघात होतात तसेच खड्डे हूकवन्याच्या प्रयत्नातही आपघात घडत आहेत.
रोज कामासाठी जाणाऱ्या वाहनधारकांच्या वाहनांचे मेंटनंस वाढले असून गाड्या पहिल्या दुसऱ्या गेअरवर चालवाव्या लागत असल्याने वाहने आवरेज देत नसल्याने शंभरी पार केलेले पेट्रोलमुळे वाहनधारकांना अर्थीक भुर्दंडही सोसावा लागत असल्याने वाहनधारक वैतागले आहेत.

गेवराई व शेवगाव तालुक्यातील जनतेच्या या रोडमुळे अक्षरश: मणके ढीले झाले असून दोन्ही तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांनी लवकरात लवकर शासनदरबारी पाठपुरावा करुन या रोडचा प्रश्न कायमचा मार्गी लावावा अशी मागणी वाहनधारकांसह नागरीक करत आहेत.ऊसाची वाहतुक करणारे ट्रेलर पलटी होत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.सध्या ऊस तोडणी सुरु आहे. एकतर ऊसाला लवकर तोड येत नाही, ऊस तोडणीसाठी पैसे मोजावे लागतात. खड्डेमय रस्त्यामुळे तोडलेला ऊस कारखान्यापर्यंत जाईल का नाही याची चिंता शेतकऱ्याला असते. खड्डे हूकवन्याच्या नादात ऊस वाहतूक करणारे ट्रेलर मधेच पलटी होत असल्याने शेतकऱ्यांना अर्थीक भूर्दंड सोसावा लागत आहे.

शेवगाव फाटा ते सुकळी फाट्या या रोडची दुरुस्ती करा नसता अंदोलन करु.गेवराई विधानसभा मतदार संघातून जाणाऱ्या नाशिक मार्गावरील शेवगाव फाटा ते सुकळी फाटा हा रस्ता उखडल्याने नागरीक, रुग्णांसह, विद्यार्थ्यांचे नाहक हाल होत आहेत. नागरीकांची होणारी गैरसोय थांबवून तात्काळ या रोडची दूरुस्ती करावी नसता वंचित बहुजन आघाडी अंदोलन करेल पप्पु गायकवाड अध्यक्ष गेवराई तालुका.लोकप्रतिनिधीसह बांधकाम विभागाचे जाणिवपूर्वक दूर्लक्ष.

प्रत्येक निवडूकीच्यावेळी आमदार, खासदार हे लोकप्रतिनिधी गेवराई शेवगाव रोडला मंजुरी आणु लवकर काम पूर्ण करु असे अश्वासन देतात मात्र निवडणूका झाल्या कि पून्हा रस्त्याविषयी चकार शब्दही काढत नसल्याचे नागरिक सांगतात. तर बांधकाम विभाग पाहूनही अंधाळ्याचे सोंग घेत असल्याने, लोकप्रतिनिधीसह बांधकाम विभागही दूर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here