



🔹प्रविण चन्नावार सामाजिक कार्यकर्ता
✒️भास्कर फरकडे(चामोर्शी तालुका प्रतीनिधी)मो:-9404071883
चामोर्शी(दि. 11 जानेवारी):-गडचिरोली जिल्ह्यातीच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्राच वैभव असलेल्या राज्यातील एकमेव असलेल्या अहेरी तालुक्यातील कमलापुर येथील कॅम्प मधील हत्ती गुजरात राज्यातील रिलायन्स ग्रुपच्या प्राणिसंग्रहालयामध्ये नेण्यात येत असल्याने जिल्ह्यातील एकमेव पर्यटन स्थळ असलेल्या हत्तींचे स्थानांतर रोखण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन पुढाकार घ्यावा असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते प्रविण चन्नावार यांनी केले आहे.
गडचिरोली जिल्हा विविध वनसंपदेने नटलेला आहे. व विविध वन्य प्राण्यांचा वावर असलेला उद्योग विरहित असलेला जिल्हा आहे.या जिल्ह्यात आजपर्यंत कोणतेच उद्योगधंदे निर्माण झाले नसल्याने येथील तरुणांना कोणतेच रोजगार उपलब्ध नाही.परंतु जिल्ह्यातील वनसंपतीवर आधारित उद्योग, व वन्यप्राण्यांचा वावर असल्याने जंगलसफारी तसेच पर्यटन स्थळे विकसित करून जिल्ह्याचा विकास होऊन स्थानिक गोरगरीब जनतेला व तरुणांना फार मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकतो.मात्र याकडे साफ दुर्लक्ष करून जिल्ह्याचे वैभव असलेला कमलापूर येथील हत्तींचे स्थानांतर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.ते होऊ नये यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते प्रविण चन्नावार यांनी केले आहे.


