Home महाराष्ट्र अज्ञात युवकाचा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यावर गोळीबार

अज्ञात युवकाचा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यावर गोळीबार

133

🔸वैद्यकीय अधिकारी रक्ताच्या थारोळ्यात ; आरोपी पसार

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो.:-823995466

उमरखेड(दि. 11 जानेवारी):-श्री.राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकिय उपजिल्हा रुग्णालयात सध्या कार्यरत असलेले बालरोग तज्ञ डॉ. हनुमंत धर्मकारे वय – 45 वर्ष पुसद रोड वरील गोरखनाथ हॉटेलच्या समोरून रुग्णालयात जात असताना अज्ञात युवकाने येऊन डॉक्टरच्या छातीमध्ये तीन ते चार गोळ्या झाडल्याची घटना घडली.यामध्ये डॉ. धर्मकारे यांची हालत चिंताजनक होती. पण यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे उमरखेड शासकीय रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सविस्तर वृत्त असे की, डॉ. हनुमंत धर्मकारे मागील 7 वर्षांपासून उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत.याशिवाय त्यांचा उमरखेड बसस्थानकाच्या समोर खाजगी बाल रुग्णालय आहे.गेल्या 7 वर्षाच्या काळात त्यांची कारकीर्द ही अतिशय सर्वसमावेशक राहिलेली आहे.या शिवाय कुठल्याही वादाच्या विषयात त्यांचे नाव चर्चेत आले नाही. असे असताना आज अचानक त्यांच्यावर अज्ञात तरुणाने गोळीबार केला. यामुळे शहरात चर्चेला पेव फुटले आहे.

शहरातील उत्तरवार रुग्णालयाच्या नजीकच असलेल्या गोरखनाथ हॉटेल येथे चहा पाण्यासाठी बैठक असते. सायंकाळी 5 वाजताच सुमारास आपल्या मोटर सायकल ते त्यांच्या खाजगी दवाखानाकडे जात असताना एक अज्ञात युवकाने त्यांच्यावर बंदूक रोखून छातीमध्ये गोळ्या झाडल्या, यात त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळाली.

त्यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो अज्ञात युवक त्याच्या शाईन गाडीने भरधाव वेगाने पसार झाला. यावेळी थारोळ्यात पडलेला डॉक्टरला नागरिकांनी उचलून येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर धर्माकारे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.ही घटना शहरात वार्‍यासारखी पसरली.यावेळी नागरिकांनी येथील शासकीय रुग्णालयात एकच गर्दी केली विशेष म्हणजे आज माझी गृह राज्यमंत्री रणजीत पाटील हे उमरखेड च्या दौऱ्यावर असताना त्यांनाही ही घटना समजली त्यांनी यावेळी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्यासोबत आमदार नामदेव ससाने,भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा हे सुद्धा यावेळी होते.

दरम्यानच्या काळात वातावरण शांत ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी, उमरखेड पोलिस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

विशेष म्हणजे मागील 8 दिवसापासून शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी उमरखेड शहरात तणावग्रस्त स्थिती असताना त्यातच उमरखेड पोलिस बंदोबस्तात असताना सुद्धा भर रस्त्यावर हा गोळीबार झाल्याने शहरात कायदा व सुव्यवस्था यावर सामान्य नागरिकांचा असंतोष होता.ती घटना वाऱ्यासारखी पसरताच येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रमेश मांडण व उमरखेड शहरातील खासगी व शासकीय डॉक्टर उपचारासाठी हजर झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here