



✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.11जानेवारी):-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. या परिस्थितीत देखील नगरसेवक फारुख पटेल यांच्या नातेवाईकांचा शाही विवाह सोहळा पार पडला आहे. दरम्यान याची माहिती मिळताच नगरपालिकेसह पोलिस प्रशासनाने या ठिकाणी धाव घेऊन पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.
दुसरीकडे बीडमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनीच चक्क डीजेच्या तालावर ठेका धरला आहे. यावेळी बेभान होऊन कोरोनाचे नियम पायदळी तुडवत डीजेच्या तालावर धांगडधिंगा सुरू होता. तर एकाच्याही तोंडाला मास्क देखील नव्हते, कपिलधार परिसरात ट्रेकिंगच्या नावाखाली शासकीय अधिकार्यांकडून ही हुल्लडबाजी केली जात होती. त्यामुळे प्रशासनाचे नियम केवळ सर्वसामान्यच आहे का? असा प्रश्न देखील आता उपस्थित होऊ लागला आहे.





