



✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
🔹न.प.मुख्याधिकारी आर्शीया जुही यांच्या सूचनेनुसार येथील व्यापारी मदान व जुनेजा यांच्या हस्ते उदघाटन
घुग्घुस(दि.11जानेवारी):-सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर तर्फे माल गुजारी तलावाच्या बाजूला असलेल्या नगर परिषेदेच्या जागेवर 600 स्केअर फूट मध्ये लाखो रुपये खर्च करून शौचालयाचे बांधकाम करण्यात आले आहे.तसेच शौचालयात भरपूर पाण्याची व्यवस्था करण्यात आली असुन हे सुसज्ज असे शौचालय महिला व पुरुष वापरणार आहे.या शौचालयाचे संपूर्ण बांधकाम झाल्यामुळे हे शौचालय नुकतेच नगर परिषेदला हस्तानंतरित केले आहे.
या शौचालयाची देखभाल नगरपरिषेद करणार असुन देखभाल करण्यासाठी या ठिकाणी दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. हे शौचालय नागरिकांना लवकर वापरता यावे यासाठी नगरपरिषेदेच्या मुख्याधिकारी आर्शीया जुही यांनी येथील व्यापारी गोपाल मदान व ठाकूर जुनेजा यांच्या हस्ते फित कापून शौलयाचे उदघाटन केले.यावेळी व्यापारी बांधव,व नगरपरिषेचे कर्मचारी उपस्थित होते.





