Home बीड कंत्राटदारांच्या धमक्यांमुळे सरकारी अभियंत्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे पिस्तुलाची मागणी ; अंबाजोगाई विभागातील प्रकरण

कंत्राटदारांच्या धमक्यांमुळे सरकारी अभियंत्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे पिस्तुलाची मागणी ; अंबाजोगाई विभागातील प्रकरण

90

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:;9075913114

बीड(दि.11जानेवारी):-अंबाजोगाईच्या बांधकाम विभागात अनागोंदी कारभार सुरू असून कंत्राटदार धमक्या देऊन, कटय़ार दाखवून देयकांवर स्वाक्षऱ्या घेतात, असा खळबळजनक आरोप करून इथे व्यवस्थित काम करता यावे त्यासाठी आपल्याला पिस्तूल देण्यात यावे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते संजयकुमार कोकणे यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना थेट पाठविलेल्या पत्रात कोकणे यांनी ही मागणी केली असून त्यांच्या या मागणीने येथील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागात डिसेंबर २०२१ मध्ये कार्यकारी अभियंता म्हणून संजयकुमार कोकणे (रा.नाशिक) यांची नियुक्ती झाली. अंबाजोगाईत येताच त्यांनी येथील कारभाराबद्दल आपली नाराजी थेट जिल्हाधिकार्यानाच पत्र लिहून व्यक्त केली आहे. आपल्या जीवाला धोका असून याठिकाणी माझ्यावर अट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो अशी भीतीही कोकणे यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here