Home महाराष्ट्र गंगाखेडकरांबद्दल मनात कायम विशेष स्थान – अशोकराव चव्हाण

गंगाखेडकरांबद्दल मनात कायम विशेष स्थान – अशोकराव चव्हाण

94

🔹कॉंग्रेस पदाधिकारी संवाद मेळावा संपन्न 

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.11जानेवारी):-शहर आणि तालुक्याविषयी आपल्या मनात कायम विशेष स्थान आहे. आपण साद द्याल तेव्हा एक तासाच्या आत मी गंगाखेडात दाखल होईल. आपल्या विकासासाठी मी काहीही कमी पडू देणार नाही, असा विश्वास राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला. गंगाखेड कॉंग्रेस पदाधिकारी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

ऊड्डाणपूल लोकार्पण समारंभानिमित्त गंगाखेडला आलेल्या अशोकराव चव्हाण यांनी कॉंग्रेसच्या शहर संपर्क कार्यालयात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष, आ. सुरेश वरपुडकर, आ. अमर राजुरकर, आ. मोहनअन्ना हंबर्डे, माजी खासदार ॲड तुकाराम रेंगे पाटील, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, शहराध्यक्ष शेख युनूस, जिल्हा ऊपाध्यक्ष ॲड संतोष मुंडे, ॲड हनुमंत जाधव, महिला प्रदेश सदस्या प्रा. शुभांगी शिसोदीया, नगरसेवक नितीन चौधरी, राजकुमार सावंत, प्रमोद मस्के, सुहास पंडीत आदिंची मंचावर ऊपस्थिती होती.

या प्रसंगी बोलताना ना. चव्हाण यांनी स्व. रतनलालजी तापडिया यांचा नामोल्लेख करत गंगाखेडशी असलेला आपला ऋणानुबंध अधोरेखीत केला. शहर आणि तालुक्यातील समस्या निकाली काढून सर्वांगीण विकासासाठी शक्य ती मदत करण्याची हमी त्यांनी दिली. गंगाखेड शहरातील नागरिकांच्या मनात कॉंग्रेस पक्षाबद्दल सदैव प्रेमाची भावना आहे. त्यांच्या मनातील हे प्रेम मतपेटीत ऊतरवण्यासाठी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन अशोकराव चव्हाण यांनी केले.

अकोली रेल्वे गेट ऊड्डाणपूल, बाह्य वळण रस्ता, भगवती कॉर्नर येथील रेल्वे भुयारी मार्ग, शहरातील अंतर्गत डीपी रस्ते, विविध प्रभागांतील सभागृहे आदि मागण्या या प्रसंगी ना. चव्हाण यांच्याकडे करण्यात आल्या. तसेच ग्रामिण भागातील रस्ते, पुल आदिंसाठी निधीची तरतूद करणे व ईतर मागण्यांचे निवेदन तालुकाध्यक्ष गोविंद यादव, शहराध्यक्ष शेख युनूस यांनी सादर केले. या बाबत सकारात्मक विचार करण्याची ग्वाही अशोकराव चव्हाण यांनी दिली. जिल्हाध्यक्ष आ. सुरेश वरपुडकर यांनी आगामी निवडणूका जिंकण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राम भोळे यांनी तर आभार प्रदर्शन नसीरभाई यांनी केले.

*चव्हाणांची ‘टि डिप्लोमसी !’*
गंगाखेड भेटीवर आलेल्या अशोकराव चव्हाण यांनी शहरातील विविध मान्यवरांच्या निवासस्थानी भेटी दिल्या. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळकाका चौधरी, कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत नुकतेच शिवसेना प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया, माजी आमदार डॉ मधुसूदन केंद्रे, माजी आ सीताराम घनदाट यांच्याशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. चव्हाण यांच्या या ‘टी डिप्लोमसी’ ची चांगलीच चर्चा झाली. आगामी नगर परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी प्रयोगाची ही नांदी तर नव्हे ? असा प्रश्न नागरिकांत चर्चीला जात होता. आ. सुरेश वरपुडकर, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव त्यांच्यासमवेत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here