Home महाराष्ट्र लग्न जोडणाऱ्या बांधवांना दोषी ठरवू नका.विजय कोळी यांचे आव्हानं

लग्न जोडणाऱ्या बांधवांना दोषी ठरवू नका.विजय कोळी यांचे आव्हानं

79
  1. ✒️शिंदखेडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

शिंदखेडा(दि.11जानेवारी):-समस्त समाज बांधवांसाठी ही पोस्ट खूप महत्त्वाची आहे असं मला वाटत. सध्या लग्न सिजन सुरू आहेत . कुणी मुलासाठी मुलगी पाहत आहे तर कुणी मुलगी साठी मुलगा. आणि लग्न जुडवतांना कुणी तरी एक बांधव मध्यस्थ पडतो आणि संबंध जुडतात. समाजात कुणी नाव ठेवायला नको म्हणून मुलगा किव्हा मुलगी समोरून कधीच सांगणार नाही की मला लग्न करायचय. या साठी कुणी बाहेरील व्यक्तीच हे काम करतो , की तुमच्या मुलाच किव्हा मुलीच लग्न या वर्षी करायचय आहे का? मग मुलीचे वडील किव्हा मुलाचे वडील ती जवाबदारी कुणी बाहेरील व्यक्तीकडे सोपवितो.

जो बाहेरील व्यक्ती मुलीचे किव्हा मुलाचे स्थळ दाखवतो तेव्हाच जाऊन हे संबंध जुडून येतात. बाहेरील व्यक्ती एक सेवा म्हणून हे कार्य करतो , त्यात त्याला कुठलाही मोबदला अथवा त्याचा कुठलाही फायदा होत नाही. तो प्रामाणिक पणे संबंध जुडवतो. संबंध जुडल्या नंतर त्यांचे विवाह देखील पार पाडतो ही त्याची सामाजिक भूमिका असते . मात्र तेच जुडवून आलेल्या संबंधमध्ये काही 3, 4 किव्हा 5 वर्षा नंतर काही तू तू , मै, मै झाले तेव्हा त्या तिराहित म्हणजेच लग्न जुडवलेल्या व्यक्तीला त्यांचे आई वडील किव्हा नातेवाईक , दोषी ठरवतात.

उदा: मी मुलगी देणार न होतो, मला आधीच माहिती होत, त्यांनी आपल्या पासून काही तरी लपवले, मुलगा किव्हा मुलगी आवडत न होती पण त्या दादांनी सांघितले म्हणून मी माझी मुलगी दिली , इत्यादी , इत्यादी.समाजात ही मानसिकता लवकर बदलणे काळाची गरज आहे , लग्न जुडवून आल्यानंतर लग्न होऊन 5 वर्ष झालीत ,जेव्हा तुमच्या मुलीचे किव्हा मुलाचे घरात चांगले चालत होते तेव्हा कधी त्या लग्न जुडवून आणणाऱ्या व्यक्तीला चहा पाण्याला विचारले का? , त्याला कधी एक फोन लावून त्याचे आभार मानले का ? त्याला कधी शाबासि दिली का ? नाही ना मग घरात भांडण झाली तेव्हा तो लग्न जुडवणाऱ्या तिराहित व्यक्तीला का बोलावलं जात . त्याने मुलीच्या पोटात किव्हा मुलाच्या पोटात घुसून पाहिलेले असते का नाही ना . मग तर लग्न जुडवणाऱ्या व्यक्तीला दोषी ठरवण्याचा किव्हा त्याला समाजात चुकीचा ठरवण्याचा कुणालाही अधिकार नाही.

लग्न जुडवतांना मध्यस्थ पार्टी फक्त मुलगा किव्हा मुलीची स्थळ दाखवतो बाकीची चौकशी मुलीच्या वडिलांनी किंवा मुलाच्या वडिलांनी करावी . कुणी तरी मध्ये पडेल तेव्हा जाऊन सुलभ रिते लग्न जुडतील. कुणी तरी मुलगा किव्हा मुलगी दाखवणार तेव्हा जाऊन कमी दिवसातच लग्न जुडतील. चुकीची मानसिकता व विचार बदला तेव्हा जाऊन समाज बदलेल लग्न जुडवणाऱ्या व्यक्तीने मुलगा अथवा मुलीची चुकीची माहिती देऊन लग्न जुडवून देऊ नका आणि कुणाच् जीवन खराब करू नका. जे असेल ते खुल्या मनाने सांघून मोकडे व्हा असे अहवान केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here